प्रा.गुरूवर्य फडणीस सर यांच्या अघोरनाथ या कादंबरीचे प्रकाशन सोहळा उत्साहात‼

सांगली न्युज:सांगली जिल्ह्यातील कडेगांव येथे अष्टदेवी मंदिरात गरूवर्य प्रा.फडणीस सर यांनी लिहीलेल्या अघोरनाथ या पुस्तक कादंबरीचे प्रकाशन ह.भ.प.श्री.दिपक महाराज यांच्या शुभहस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाला.या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना ह.भ.प. दिपक महाराज म्हणाले की मृत्यु नंतरचा विचार या पुस्तकात केला आहे.माणसाने कर्म करताना आपला मृत्यु केव्हाही ओढवु शकतो.हे लक्षात ठेवुन कर्म करावे त्यामुळे मनुष्य चुकीचा वागणार नाही.या कादंबरीत बऱ्याच गोष्टी कलात्मक रितीने दिलेल्या आहेत.वाचकांनी याचा लाभ घ्यावा.गुरूवर्य प्रा.फडणीस सर म्हणाले की पुस्तकाचा विषय अत्यंत गुढ,गंभीर व रहस्यमय आहे.अघोरी साधकांच्या जीवनावरचे हे पुस्तक आहे.अघटीत घटना,अकल्पनिय घटना यांचा आयुष्यात सामना करत ,कठोर तप करत या साधकांचे व्यक्तीमत्व तयार होते.भिती व नैराश्य यांच्यावर विजय मिळवण्याचे कसब अवगत करतात.आज तरूण पिढी भविष्याच्या भितीने व वर्तमानाच्या नैराश्याने ग्रासली आहे.त्यातुन बाहेर पडणे गरजेचे आहे.या कादंबरीतुन त्यांनी हा बोध घ्यावा.यावेळी डॉ.अतकरे,कैलास कटारे,सुधाकर चव्हाण,प्रकाश शिंदे आण्णा,माजी सहाय्यक निरिक्षक तानाजीराव भोसले,हणमंत रास्कर,तात्यासाहेब मोरे,वन विभागाचे मोहीते,विश्वास व्यास,प्रशांत भोसले ,प्रकाश नलवडे ईत्यादी मान्यवर व मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.आभार धनंजय भैय्या देशमुख यांनी मानले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधाकर चव्हाण यांनी केले.