राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरण पादुका पालखीचे उद्या अकोटला आगमन

0
1573
Google search engine
Google search engine

आकोट/संतोष विणके

गुरुदेव सेवाश्रम पाटसुल ते मोझरी जाणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चरण पादुकांच्या पालखीचे उद्या अकोटला आगमन होणार आहे.दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील उद्या दि. 22 सोमवार ला गुरुदेव भक्त श्री अशोक दादा मुंडगावकर यांच्या वाडीत पालखी एक दिवस मुक्कामी येणार असुन या निमित्त मुंडगावकर परिवाराच्या वतीने पालखीतील गुरुदेव भक्त तथा यात्रेकरूंचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे.

दरवर्षी यात्रेकरूंचे स्वागत पालखीचे दर्शन तथा गोपाळकाल्याच्या कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन करण्यात येत असते या वर्षी देखील महाराजांच्या पालखीचे दर्शन प्रसाद तथा पूजनाचा कार्यक्रम अशोक दादा मुंडगावकर यांच्या वाडीत आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या वर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ५० वा पुण्यतिथी महोत्सव साजरा होणार आहे.

यानिमित्ताने मातृ-पितृ स्मृतिदिन व गुरु पूजनाचा कार्यक्रम देखील संपन्न होणार आहे सर्व गुरुदेव भक्त तथा राष्ट्रसंत विचार प्रेमींनी सकाळी 11 ते 4 पालखीच्या दर्शनाचा लाभ घेण्याची विनंती श्री अशोक दादा मुंडगावकर वीरेंद्र अशोक मुंडगावकर व सचिन अशोक मुंडगावकर तथा मुंडगावकर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.