चांदुरबाजार – कुऱ्हा (देशमुख) येथील नवदुर्गा विसर्जन दरम्यान देवी असलेल्या ट्रॅक्टर ट्रालीला भिषण अपघात- 24 भक्त जखमी >< लहान मुलांचा समावेश

0
1943
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार:- स्थानिक चांदुर बाजार तालुक्यातील कुऱ्हा (देशमुख) येथील भक्त नवदुर्गा विसर्जना करिता आज 21 आॅक्टोबर रोजी सायंकाळ च्या दरम्यान 5 वाजता जवळच असलेल्या आडनदी येथे नवदुर्गा देवी मृर्ती सह भक्त ट्रॅक्टरमध्ये जात असताना अचानक ट्रॅक्टर व ट्राॅली मधील जोडणारी कंप्लीग तुटल्याने भीषण अपघात होऊन कुऱ्हा (देशमुख) येथील भक्त सारंग कैलास राऊत (13)सिध्देश्वर चरणदास वैराळे (14)निर्मल प्रभाकर राऊत(40) भारती नंदकुमार वैराळे(25) प्रणय राजु राऊत(18) रोहण नंदकिशोर शिंदे(15) आकाश प्रल्हाद केनेकर(25) (25)अंकिता अशोक राऊत (21)वैभव रविंद्र राऊत (18)कुणाल उमेश अगाळे(14) कविता गणेश अगाळे(40) अमित गणेशराव अगाळे(18) श्रावण उमेश अगाळे(10) श्रेया उमेश वैराळे(10) कुसुम श्रीराम वैराळे (50)जोत्सना उमेश अगाळे(32) रेखा अशोक राऊत (40)गणेश शामराव अगाळे (40)

विवेक दिनेश आवारे 22 वर्ष, ओमप्रकाश केनेकर (25) ऋतीका शेखर देशमुख(6) कविता शेखर देशमुख(25) संचिता नंदकुमार वैराळे (10)वैशाली कैलास राऊत(32)

या जख्मी भक्ताना तात्काळ अचलपुर उपजिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून गंभीर रूग्णाना अमरावती येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात पुढिल उपचारा करिता पाठविण्यात आले .