लातूरचे पोलिस अधिक्षक देतील का याकडे लक्ष ? अपघात होऊन दहा दिवस झाले पोलिस ठाण्यातून फाईल गायब ; आरोपीला अभय

0
1434
Google search engine
Google search engine

हिच ती आपघातातील गायब झालेली मोटार सायकल

उस्मानाबाद – औसा तालुक्यातील आलमला पाटिवर आपघात झाला होता त्या अपघातात कोंड ता उस्मानाबाद येथील रावसाहेब जमादार हे जागीच मयत झाले होते त्यांच्या घाटनेचा पंचनामाही झालेला होता घटनेतील मोटारसाकल पोलिसांनी जप्त न करता ढाब्यावर लावली व तेथून ती मोटारसायकल गायब करण्यात आली सदर घटनेचा तपास हे लातूरचे पोलीस करत होते लातूरच्या सरकारी दवाखान्यातील पोलिस चौकितून आपघाताची फाईल गायब ; आरोपी व मोटारसायकलही फरार झाल्यामुळे या घटनेची चर्चा सध्या मोठ्या फ्रमाणात लातूर जिल्ह्यात सुरु आहे घटना घडून दहा दिवस झाले तरीही अद्यापही गुन्हा दाखल न झाल्यामुळे मयत रावसाहेब जमादार यांच्या पत्नी रेखा रावसाहेब जमादार यांनी हि दिलेली माहिती अशी कि या घाटनेत पोलीसांनी आरोपीसोबत हातमिळवणी करुन आरोपींना फरार करण्यात पोलिसांचाच हात आसल्याचा संशय व्यक्त केला आहे घाटना घडून दहा दिवस झाले फाईल गायब आणि आरोपीही सरकारी दवाखान्यातून फरार मोटार सायकलही गायब हा नेमका काय प्रकार आहे असा सवाल ही रेखा जमादार यांनी केला आहे औसा तालुक्यातील आलमला पाटिवरील झालेल्या आपघाताची फाईल लातूर येथील सरकारी दवाखान्यातील पोलिस चौकितून गायब झाली असून सदर अपघातातील आरोपींनी दवाखान्यातून पळ काढला आसून मोटारसायकलही गायब करण्यात आली आहे त्यामुळे या घटनेची चर्चा सध्या जोरात सूरु आहे कोंड ता उस्मानाबाद येथील रावसाहेब नागनाथ जमादार हे सेलू ता औसा येथील संतोष जाधव यांच्या शेतात दोन महिन्यापासून कामाला होते १२ ( शुक्रवारी) रावसाहेब जमादार हे आलमला पाटी येथून रस्ता क्राँस करताना लातूरच्या दिशेने भरदाव वेगाने मोटारसायकलवर दोन जण होते त्यांनी हिरो होंडा कंपनीची स्पेंलडर kA38 – U 6763 या मोटारसाकलने धडक देऊन रावसाहेब जमादार यांचा जागेवर म्रत्यू झाला दरम्यान मोटारसाकलवर असलेल्या तरूण जखमी झाले होते त्यांना लातूरच्या सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते परंतू त्यांनी दोघांनीही पळ काढला व घटना स्थळावरील मोटारसायकल हि गायब करण्यात आली आहे त्यामुळे औसा पोलीस ठाण्याच्या हद्दित अपघात घडलेला आसताना पोलिसांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले आसल्याची माहिती रावसाहेब जमादार यांच्या पत्नीने आमच्याशी बोलताना दिली आहे तसेच लातूर येथील सरकारी दवाखान्यातील पोलीस चौकितून फाईल गहाळ झाली आहे असेही लातूर येथील पोलिसांनी सांगीले असल्यामुळे नेमका हा प्रकार काय होत आहे आसा प्रश्नही जमादार यांच्या पत्नीं रेखा जमादार यांनी सांगीतले पोलिस सुतावरून स्वर्ग गाटतात परंतू अद्यापही पोलिसांना गायब आसलेली फाईल व आरोपी मोटारसाकलचा थांगपत्ता लागत धसल्यामुळे दुखद आसलेले जमादार कुटूंबीयांनी घणाघाती आरोप केले आहेत लातूर पोलिसांकडे लातूरचे पोलिस अधिक्षक साहेब लक्ष देतील का ? हा झालेला प्रकार हा कितपत योग्य आहे ? पंचनामा केलेली मोटार सायकल पोलिसांनी जप्त का नाही केली ? हा प्रकार अतिशय गंभीर व संशयास्पद असून यावर आता पोलिस अधिक्षक काय कार्यवाही करणार याकडे जमादार कुटूंबाचे लक्ष लागले आहे असे रेखा जमादार यांनी आमच्याशी बोलताना सांगीतले आहे