रमाई आवास योजना लाभार्थांना घरकुलाची रक्कम त्वरित मिळावी….प्रहारची निवेदनाद्वारे मागणी

0
725
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी / अमरावती  –

जिल्ह्यातील रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळालेल्या लाभार्थांना मागील तीन वर्षापासून घरकुलाची रक्कम मिळालेली नसल्याने प्रहारचे जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रविण हेंडवे यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,अमरावती प्रकल्प संचालक आनंद भंडारी यांच्या कडे जिल्ह्यातील मंजूर लाभार्थांना घरकुलसाठी रक्कम प्रदान करण्यात याबाबतीत निवेदन सादर केले आहे. जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांना सुध्दा निवेदनाची प्रत माहितीस्तव व कार्यवाही करिता सादर करण्यात आली आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाने निवेदनात असेही नमूद केले आहे की, शासनाने रमाई आवास योजना अंतर्गत जिह्यामध्ये अनुसूची जातीच्या लोकांना घरकुल मंजूर केले.सन २०१६ -१७ मध्ये मंजूर लाभार्थांना घरकुल बांधणीसाठी पहिला हप्ता दिला परंतु जिल्ह्यातील शेकडो लाभार्थांना दुसरा हप्ता प्रशासनाकडून तीन वर्षापासून मिळाला नसल्याने लाभार्थांचे घरकुल पुर्ण करु शकले नाहीत त्यामुळे शेकडो लाभार्थांना उघड्यावरच राहत आहेत लाभार्थांचे आर्थिक व मानसिक नुकसान होत आहे प्रशासनाकडून रक्कम मिळाली नसल्याने अनुसूचीत जातीच्या लोकांना घरकुल बांधण्याचा कार्यासाठी विलंब होत आहे प्रशासनाने तात्काळ अडचणी शोधून घरकुलाचे काम पूर्ण करण्यासाठी लाभार्थांच्या खात्यात रक्कम तातडीने करावी.यावेळी निवेदन सादर करतांना प्रहारचे जिल्हाप्रमुख प्रविण हेंडवे सह प्रहारचे श्री प्रदिप वडतकर , प्रहार विद्यार्थी संघटना तालुकाप्रमुख अक्षय धोपटे, रोशन देशमुख व कार्यकर्ते यांची उपस्थित होती ….