राष्ट्रउभारणीच्या कार्यात सज्जन शक्तींनी सक्रीय व्हावे :- डॉ. दत्तात्रय रत्नपारखी

0
562
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान  ) 
समाजात सकारात्मक बदल घडवायचा असेल तर समाजातील सज्जन शक्तिंना सक्रिय करुण दुर्जन शक्तिंना परास्त केले पाहीजे हेच कार्य संघ अविरतपणे  करीत आहे आणि आज समाजात  सकारात्मक बदल घडुन कुटबुंव्यवस्था मजबुत करण्याकरीता कुटुंबप्रबोधन गतिविधी सुरु करुन कुटुंबप्रबोधनाचे कार्य संघाने सुरु केले आहे. यामध्ये समाजातील सज्जन शक्तिंनी सहभागी होण्याचे आवाहन रा.स्व.संघ अमरावती जिल्हा कार्यवाह डॉ. दत्तात्रय रत्नपारखी यांनी विजयादशमीच्या उत्सवप्रसंगी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचा चांदुर रेल्वे नगराचा विजयादशमी उत्सव जैन मंदिर प्रांगणात पार पडला त्यावेळी ते बोलत होते .
    या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन चंद्रदिप उर्फ नानासाहेब डोंगरे (सेवानिवृत्त शिक्षक) उपस्थित होते व्यासपीठावर जिल्हासंघचालक अॅड. अरुण जिचकार, तालुका संघचालक वासुदेवराव मानकानी उपस्थित होते. डॉ.रत्नपारखी पुढे म्हणाले की आज संघ सर्व क्षेत्रात पोहचलेला असुन समाजाचे कोणतेही अंग रिते नाही .संघाने सामाजिक परिर्वतनाचे जे शिवधनुष्य उचलेले आहे त्याला समाजातील सज्जन शक्तिचा हातभार लागला पाहीजे .संघाने अनेक सेवाकार्य स्वबळावर सुरु केले आहे समाजातील कोणताही घटक उपेक्षित राहु नये प्रत्येक घटकाला राष्ट्रीय विचाराशी जोडण्यांचे कार्य संघ करतो आहे. असे विचार व्यक्त करतांनाच बाह्यप्रचारावर विश्वास न ठेवता संघकार्य जवळुन बघण्याचं आवाहन केले तत्पुर्वी प्रमुख मार्गावरुन पथसंचलन काढण्यात आले .
                   संचलन प्रास्ताविक परिचय आभार नगरकार्यवाह मनोज मिसाळ यांनी केले. सुभाषितं यश मानकानी, अम्रुतवचन पंकज मानकानी, वैयक्तिक गित प्रविण ढाकुलकर यांनी सादर केले. यावेळी ता. कार्यवाहक पराग मेंढे व नगरातीलअनेक गणमान्य व्यक्ति हजर होते.