महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्य निबंध स्पर्धा – ४५५ विद्यार्थ्याचा सहभाग >< युवक काँग्रेसचे आयोजन

0
677
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान  ) 
महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्य महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या  वतीने आयोजित तालुक्यात निबंध स्पर्धेत ४५५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
   चांदूर रेल्वे तालुक्यात विविध विद्यालयात निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत ४५५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली होती. यामध्ये  वर्ग ५ ते ७ व वर्ग ८ ते १० पर्यंत च्या गटात स्पर्धकांनी आपले निबंध सादर केले  या स्पर्धे वर्ग ५ ते ७ च्या घटात  चांदुर कन्या शाळेची धनश्री संतोष आखरे हिने प्रथम क्रमांक मिळविला. तर मन्नालाल गुप्ता विद्यालयातील देवेश दयारामजी सोमनाथे याने द्वितीय तर तृतीय क्रमांक जिल्हा परिषद चांदूर रेल्वे चा प्रिती वाहने यांनी मिळविला.
तर वर्ग ८ ते १० च्या गटात प्रथम क्रमांक मनस्वी बडवाईक, द्वितीय क्रमांक जीवन धुमनखेडे व तृतीय क्रमांक विशाखा शेळके यांनी मिळविला. यामध्ये प्रथम पारीतोषिक एक हजार रुपये,  द्वितीय पारितोषिक पाचशे रुपये तर तृतीय पारितोषिक व सहभाग नोंदवीणाऱ्या विद्यार्थ्यना प्रशस्ती पत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी नारपरिषद अध्यक्ष निलेश सूर्यवंशी, युवक जिल्हा काँग्रेस अध्यक्ष परीक्षित जगताप, विधानसभा अध्यक्ष संदीप शेंडे, शहेजाद सौदागर, नगरसेवक सुजीत माकोडे, प्रवण भेंडे, रुपेश पुडके, सौरभ इटके आदी उपस्थित होते.