धर्मांधांकडून विश्व हिंदु परिषदेच्या शाखा अध्यक्षाची हत्या – नवरात्रीचा फलक लावल्याच्या रागातून हत्या ४ धर्मांधांना अटक

196

 

 

भावनगर (गुजरात) – येथील महुआ येथे रहाणारे विश्‍व हिंदु परिषदेचे नेते जयेश गुजरीया (वय २२ वर्षे) यांच्यावर धर्मांधांनी तलवारीने आक्रमण करून त्यांची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी असलम, इमरान, बापुडी मियाँ तसेच अन्य एक जण अशा ४ धर्मांधांना अटक केली आहे. विहिंपने गुजरीया यांची नुकतीच महुआ शाखा अध्यक्षपदी निवड केली होती. ते या भागातील प्रसिद्ध गोरक्षक होते.

प्राप्त माहितीनुसार २३ ऑक्टोबरला रात्री उशिरा ४ धर्मांध दुचाकीवरून आले आणि त्यांनी जयेश गुजरीया यांच्यावर तलवार, चाकू आणि पाईप यांद्वारे आक्रमण केले. गुजरीया यांच्यावर आक्रमण करतांना धर्मांध ‘नवरात्रीचा फलक का लावलास ?’, असा प्रश्‍न वारंवार चिडून विचारत होते. या वेळी गुजरीया यांच्यासमवेत असलेल्या त्यांच्या दोघा सहकार्‍यांंनी गुजरीया यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता धर्मांधांनी त्या दोघांवरही आक्रमण केले. या आक्रमणात गुजरीया हे गंभीररित्या घायाळ झाले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेले असता तेथे त्यांचा मृत्यू झाला. आक्रमणानंतर धर्मांध घटनास्थळावरून पसार झाले. त्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. नवरात्रीमध्ये जयेश गुजरीया आणि धर्मांध यांच्यात मारामारी झाली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।