मी कुणाला कळलो नाही

169

मी कुणाला कळलो नाही

—————————————
*मित्र कोण आणि शत्रू कोण*
*गणित साधे कळले नाही..*
*नाही भेटला कोण असा*
*ज्याने मला छळले नाही…*
*सुगंध सारा वाटीत गेलो*
*मी कधीच दरवळलो नाही..*
*ऋतू नाही असा कोणता*
*ज्यात मी होरपळलो नाही..*
*केला सामना वादळाशी*
*त्याच्या पासून पळालो नाही..*
*सामोरा गेलो संकटाना*
*त्यांना पाहून वळलो नाही..*
*पचऊन टाकले दु:ख सारे*
*कधीच मी हळहळलो नाही..*
*आले जीवनी सुख जरी*
*कधीच मी हुरळलो नाही..*
*कधी ना सोडली कास सत्याची*
*खोट्यात कधीच मळलो नाही..*
*रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच मला*
*”मी कुणाला कळलोच नाही..”*

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।