युवक कॉंग्रेसच्या विधानसभा अध्यक्षावर खंडणीचा गुन्हा दाखल – वसतीगृहात अन्न पुरवठा करणाऱ्या महिलेची तक्रार

0
1471

राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

अमरावती – (प्रतिनीधी)

चांदूर रेल्वे येथील शासकीय मुलींच्या वसतीगृहात अन्न पुरवठा करणाऱ्या महिला कॉन्ट्रॅक्टरला चांदूर रेल्वे येथील युवक कॉंग्रेसच्या विधानसभा अध्यक्षाने खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक एस. टी. आगाराच्या मागे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींच्या शासकीय वसतीगृहात तीन दिवसांपुर्वी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाऊन तेथील गलथान कारभार पुढे आणला होता. यानंतर या वसतीगृहात अन्न पुरवठा करणाऱ्या महिला कॉन्ट्रॅक्टरला युवक कॉंग्रेसच्या चांदूर रेल्वे येथील विधानसभा अध्यक्षाने खंडणी तसेच शरीरसुखाची मागणी केली. या आशयाची तक्रार चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला ३० ऑक्टोंबरला दिली. या तक्रारीवरून पोलीसांनी संदिप शेंडे यांच्यावर कलम ३८४, ३५४ (अ) (ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आणखी ८ ते १० युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये अजुन कोणालाही अटक करण्यात आलेली नसुन राजकीय वर्तुळात मात्र एकच खळबळ उडाली आहे. पोलीसांनी फिर्यादी यांचे इन कॅमेरा बयाण नोंदविले असुन पुढील तपास ठाणेदार ब्रम्हदेव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय लसंते करीत आहे.

शासकीय वसतीगृहातील गलथान कारभार चव्हाट्यावर आला असतांना खंडणी मागीतल्याची पोलीसात तक्रार दाखल झाल्यामुळे शहरात अनेक चर्चांना उधान आले होते. परंतु या प्रकरणात नेमकं सत्य काय आहे ? हे चौकशीअंती कळणारच ऐवढे मात्र नक्की.

तक्रार प्राप्त झाली आहे. सदर प्रकरणाची चौकशी पीएसआय लसंते यांच्याकडे सुपुर्द केली असुन पुढील चौकशी सुरू आहे.

– ठाणेदार ब्रम्हदेव शेळके