चांदूर रेल्वेत लिगल – एड- क्लीनीक विधी सेवा केंद्राची स्थापना

0
567
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 
       महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अमरावती यांच्या आदेशानुसार चांदूर रेल्वे तालुका विधी सेवा समिती अंतर्गत तालुक्यातील नागरिकांना विधी सेवा योजनांचा लाभ व माहिती घेता यावी या दृष्टीने लिगल – एड- क्लीनीक विधी सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्राची स्थापना पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे व दर्शनी कार्यालय दिवाणी व फौजदारी न्यायालय चांदूर रेल्वे येथे तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एस.सी. खैरनार यांच्या हस्ते करण्यात आली.
      यावेळी तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष एस.बी. देशमुख,  उपाध्यक्ष अंबापुरे, अॅड. मकेश्वर, अॅड. वाल्दे, अॅड. मैंद, कायदासाथी श्री. वाघमारे, कु. पाटील तसेच न्यायालयीन कर्मचारी व तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.