एमएसएमई सपोर्ट अँड आऊटरीच कार्यक्रम सर्व यंत्रणांनी समन्वयाने यशस्वी करावा – जिल्हाधिकारी वि. ना. काळम

Google search engine
Google search engine

– प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधणार संवाद- देशभरातील निवडक 80 जिल्ह्यात सांगलीचा समावेश- जिल्हाधिकारी कार्यालय येथे दोन वाजता प्रारंभ- 100 दिवस चालणार कार्यक्रम- छोट्या, मध्यम व्यवसायांना वाढीच्या जलद पथावर नेणारा कार्यक्रमसांगली, दि. 1, (जि. मा. का.) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लघु व मध्यम उद्योजकांसाठी सुलभ मार्ग एमएसएमई सपोर्ट अँड आऊटरीच या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचा शुक्रवार, दि. 2 नोव्हेंबर रोजी प्रारंभ करणार आहेत. छोट्या आणि मध्यम व्यवसायांना वाढीच्या जलद पथावर नेण्यासाठी कर्ज प्रक्रिया सुलभ व्हावी, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या कार्यक्रमांतर्गत देशभरातील 80 जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्याची एकतर्फी संवादासाठी निवड झाली आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तसेच सांगली जिल्हा आदर्श उदाहरण ठरावे, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. अशा सूचना जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी आज येथे दिल्या.एमएसएमई सपोर्ट अँड आऊटरीच या कार्यक्रमाच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सहसचिव कमल दत्ता, अपेडाचे लोकेश गौतम, फॉरेन ट्रेडचे उपसंचालक विशाल शर्मा, बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक आदर्श अरोरा, बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी झोनल मॅनेजर व्ही. एम. परळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. त्रिगुण कुलकर्णी, अग्रणी बँक व्यवस्थापक सी. बी. गुडस्कर आदिंसह अधिकारी, उद्योजक आदि उपस्थित होते.जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, एमएसएमई सपोर्ट अँड आऊटरीच हा कार्यक्रम 100 दिवस चालणार आहे. हा उपक्रम छोट्या व मध्यम व्यवसायांना वाढीच्या जलद मार्गावर नेण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहे. या अंतर्गत केवळ 59 मिनिटांत 10 लाख रुपयांपासून 1 कोटी रुपये कर्ज मिळू शकणार आहे. त्यासाठी जी. एस. टी. क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि आयकर परताव्याची कागदपत्रे अपलोड करावयाची आहेत. त्यानंतर जलद व सुलभ प्रक्रियेने कर्ज मिळू शकणार आहे.केंद्रीय सहसचिव कमल दत्ता म्हणाले, छोट्या व मध्यम उद्योजकांच्या उत्पादनांना जास्तीत जास्त बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टीने गव्हर्नमेंट मार्केट प्लेस या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. छोट्या व मध्यम उद्योजकांना खेळते भांडवल मिळावे तसेच, उत्पादित मालाची निर्यात करण्यासाठीही मार्गदर्शन मिळणार आहे. या लाभार्थींना सामाजिक आर्थिक सुरक्षा कार्यक्रमांचेही लाभ मिळणार आहेत. तसेच, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचावा, यासाठी सुनियोजित प्रयत्न करावेत. विशेष मोहीम हाती घ्यावी.बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक आदर्श अरोरा म्हणाले, हा केंंद्र शासनाचा कार्यक्रम असून सर्व बँका आणि शासकीय विभाग यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम समन्वयाने उत्कृष्ट पद्धतीने यशस्वी करावा. स्थानिक लघु व मध्यम उद्योजकांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यांना मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.व्ही. एम. परळीकर म्हणाले, सांगली जिल्ह्यातील उद्योजकात काम करण्याची तडफ, धाडस आणि जिद्द आहे. म्हणूनच देशभरातील 600 जिल्ह्यांतून सांगली जिल्ह्याची या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. येथील लघु व मध्यम उद्योजकांना पैलू पाडण्यासाठी हा कार्यक्रम मदतीचा ठरणार आहे. तरी सर्व बँकांनी त्यांच्या जास्तीत जास्त ग्राहकांना या कार्यक्रमाची माहिती द्यावी व या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती करावी.एमएसएमई सपोर्ट अँड आऊटरीच या राष्ट्रीय कार्यक्रमाचा शुक्रवार, दि. 2 नोव्हेंबर रोजी प्रारंभ होणार आहे. सांगली येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, केंद्रीय सचिव स्तरावरील अधिकारी, जिल्हा स्तरावरील अधिकारी, उद्योजक, व्यावसायिक, लाभार्थी उपस्थित राहणार आहेत. तरी गरजूंनी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे.या बैठकीस केंद्रीय जी. एस. टी. विभागाचे सहाय्यक आय़ुक्त दिनेश नानल, राज्य जी. एस. टी. उपायुक्त योगेश कुलकर्णी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नितीन कोळेकर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक संजय माळी, केंद्रीय जी. एस. टी विभागाचे निरीक्षक राजेंद्र मेढेकर, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे समन्वयक सर्जेराव पाटील यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी, बँकांचे अधिकारी, उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.