ए.टी. झांबरे विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी

0
1125
Google search engine
Google search engine

जळगाव :-

के.सी.ई. सोसायटी संचालित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम शाळेचे मुख्या.दिलीपकुमार चौधरी पर्यवेक्षिका उषा नेमाडे यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

उपशिक्षिका प्रणिता झांबरे यांनी विद्यार्थ्यांकडून राष्ट्रीय एकता दिवस शपथ ग्रहण करून घेतली व त्याविषयी मार्गदर्शन केले.तर विद्यार्थ्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी माहिती सांगितली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कोळी तर आभार प्रदर्शन तडवी सर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षक सतीश भोळे , एकनाथ पाचपांडे , डी. ए.पाटील , बिपीन झोपे आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.