नांदुरा बु. येथील अंतर्गत रस्ता बांधकामाचे भूमिपूजन संपन्न – गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

0
740

अमरावती :- बुधवार ३१ तारखेला  नांदुरा बु येथे गावाअंतर्गत रस्ता बांधकामासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रकाशदादा साबळे यांच्या निधीतून निधी मंजूर झाल्यामुळे त्या रस्त्याचे भूमिपूजन नांदुरा बु गावातील गुणवंत विद्यार्थी प्रथमेश विजयकर व गुंजन गडलिंग यांच्या शुभहस्ते करण्यात आले

याप्रसंगी सरपंचा सौ मुंदावणे ताई, उपसरपंच श्री बाळासाहेब किरकटे, पं. स. सदस्य श्री गणेश कडू, श्री नितीनदादा किरकटे, शांतारामजी किरकटे, दयारामजी किरकटे, अविनाश किरकटे, ग्रा. पं. सदस्य सगणे ताई , अकोशदादा महल्ले, संदीपराव सगणे, धनंजयभाऊ अग्रवाल, मनोज अग्रवाल, सोनू राऊत, ग्रा. पं. सदस्य राजुभाऊ भाकरे, श्री शरदराव किरकटे, राहुल किरकटे, राऊत बाप्पू, सौरभ किरकटे व संपूर्ण गावातील प्रतिनिधी मंडळी उपस्थित होती.

याप्रसंगी गुणवंत विद्यार्थी यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. आवश्यक कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही आणि विशेषकरून पांदण रस्त्यासाठी अधिक प्रयत्न करू असे याप्रसंगी जी. प. सदस्य प्रकाश साबळे यांनी सांगितले