उस्मानाबाद आरटिओने ठेवले खाजगी दलाल ;वाहनधाराकांची लुट

0
877

उस्मानाबाद – उस्मानाबाद येथील परिवहन कार्यालयात भोंगळ कारभार सुरु आहे पैशे उकळण्याचे खुलेआम प्रकार सुरु आहेत १३ नंबर रुमच्या खोलीत एक इसम खुलेआम पैशे घेत आसुन डेपोटि आर टि ओ च्या कँबीन व मधील रुममध्ये संगणक रुममध्येही रोजमाटा कंपनीचा एक मुलगा सतत आतबाहेर करत आसतो हा प्रकार नेमका काय सावळ्या गोंधळात होत आहे असा प्रश्न निर्माण होत आहे हा प्रकार वरिष्ठ अधिकार्याच्या मर्जीने चालत आसून यात वाहन धारकाची मोठ्या प्रमाणात अर्थीक लुट केली जात आहे या कार्यालयात लायसन्स काढण्यासाठी, गाडी पासिंग करण्यासाठी , वाहनावरील केसेस , व इतर वाहनासंबंधी कामासाठी नागरीकांची उस्मानाबाद जिल्ह्यातून मोठी वर्दळ असते .शासकिय नियमाप्रमाणे पावती दिली जाते ,मात्र अतिरिक्त घेतलेल्या रकमेची पावती दिली जात नाही यासाठी उस्मानाबाद परिवहन विभागाने खाजगी दलाल पोसले आहेत त्या दलालामार्फत अर्थीक देवाणघेवाण होते दररोज लाखो रुपयाची उलाढाल खाजगी दलालामार्फत केली जाते अच्छे दिन म्हणजे हेच का ? वाहन धारकांची अर्थीक लूट म्हणजे अच्छे दिन होय असे वाहन धारक खाजगी सांगत आहेत .उस्मानाबाद जिल्ह्यात तिव्र दुष्काळाचे सावट आसून नागरीक या सावटाखाली गुदमरुन जात आहे परंतू उस्मानाबाद परिवहान कार्यालयात पैशांचा सुकाळ आहे .