अकरा कुटुंबाना दिपावळीचा संपूर्ण फराळाचा किराणा स्वखर्चाने भरुन दिला;बेंबळी पोलीस स्टेशनचे हे.कॉ.रविंद्र धोंडीराम कचरे यांचा स्तुत्य उपक्रम

315

अकरा कुटुंबाना दिपावळीचा संपूर्ण फराळाचा किराणा स्वखर्चाने भरुन दिला;बेंबळी पोलीस स्टेशनचे हे.कॉ.रविंद्र धोंडीराम कचरे यांचा स्तुत्य उपक्रम

उस्मानाबाद -दुष्काळाचे गंभीर सावट व अत्यंत हलाखीची परिस्थिती पाहता कितीतरी कुटूंबात दिवाळी सण साजरा होणार नाही.हे पाहुन आपणही समाजाचे देणे लागतो.मग काही गरीब कुटूंबांना दिपावळीचा लागणारा सर्व किराणा भरुन देऊ.व बेंबळी हद्दीतील पोलीस पाटील,पोलीस मित्रांकडुन अशा कुटूंबाची माहिती संकलीत करुन आकाश कंदील,मोती साबणासह संपूर्ण किराणा भरुन दिला.असे स्तुत्य काम केले आहे ते बेंबळी पोलीस स्टेशनला चालक पदावर कार्यरत असलेले हेकॉ.रविंद्र धोंडीराम कचरे (बक्कल नंबर ३९१) यांनी. केशेगांव,ताकविकी,बेंबळी,करजखेडा व लासोना येथील गरीब कुटूंबात हेकॉ.कचरे यांच्यामुळे दिवाळी साजरी झाली.