स्वस्त धान्य दुकानातील बंद पॉज मशीनला हार घालुन शिवसेनेचे सभापती मनिष कराळे यांनी नोंदवला निषेध…

0
1534
Google search engine
Google search engine

अकोट/प्रतीनीधी

दिवाळीच्या काळात अकोट तालुक्यातील अन्न व पुरवठा विभागाच्या स्वस्त धान्य दुकानातील .पॉश मशीन व धान्य वाटप यंत्र बिघाडांमुळे सर्वसामान्य जनतेच्या दिवाळीत अडचण निर्माण झाली आहे.शासनाने काही दिवसांपूर्वी खूप गाजावाजा करत प्रत्येक स्वस्त धान्यांच्या दुकानावर डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत इ.पॉश मशीन व धान्य वाटप यंत्र बसवले.पण ऐन सणासुदीच्या काळात ते नेटवर्क मुळे बंद पडत आहेत त्यामुळे सर्वसामान्य जनतेची गैरसोय होत आहे व यामुळे ती त्रस्त झाली आहे.आज त्यांना दिवाळीची सर्व इतर महत्वाची कामे सोडून धान्यांसाठी तासनतास लाईन मध्ये उभं राहावं लागतं आहे.इतकं करूनही ती यंत्र नेटवर्क गेले की,लाईट गेली की,सर्व्हर डाऊन असले की बंद पडत आहेत आणी काही ठिकाणी तर चालूच झाली नसल्याच्या तक्रारी आहेत.

यावर पर्याय म्हणून पुरवठा विभागाकडे कोणतीही उपाययोजना नाही.त्यामुळे शासनाच्या या कमी किंमतीत डिजिटल पद्धतीने धान्य देण्याचा प्रयत्न सपशेल अयशस्वी ठरतोय की काय अशी परीस्थीती आहे.वास्तवीक पाहता यावर्षी संबंधित खात्याच्या अन्न व पुरवठा मंत्र्यांनी लोकांना १कीलो साखर,१की.चना डाळ,१की.उळद डाळ ही दिवाळीची भेट म्हणून राशन कार्ड वर दिली जाणार अशी घोषणा केली होती.मात्र प्रत्यक्षात अंत्योदय बीपीएल या कार्डावरच फक्त साखर मिळत आहे.यावर्षी दुष्काळी परिस्थिती असतांना शेतकऱ्यांना यामध्ये वगळण्यात आले आहे.यामुळे सर्वसामान्य जनतेच्या त्रासाला पाहून व त्यांच्या या अतिमहत्त्वाच्या प्रश्नाला सोडविण्यासाठी शिवसेनेचे सभापती मनिष कराळे यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसह स्वस्त धान्य दुकानात जाऊन बंद असलेल्या यंत्रांना हार घालून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवीला

यावेळी मनिष कराळे यांनी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या व याबाबत त्वरित सविस्तर माहीती शिवसेनेचे आमदार श्री.गोपिकीशन बाजोरिया साहेब यांच्याशी संपर्क साधून दिली.यावेळी आमदार साहेबांनी आपण यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. अशी माहिती सभापती मनिष कराळे यांनी दिली व बोलताना पुढे सांगितले की जर पुरवठा विभागाच्या या ढेपाळलेल्या कार्यशैलीत लवकरात लवकर सुधारणा न झाल्यास सर्वसामान्य जनतेसाठी शिवसेना रस्त्यावर उतरनार असा इशारा पुरवठा विभागाला दिला.