माधान येथे वाघ दिसल्याची चर्चा,वन विभाग व पोलीस प्रशासन शोधात. अफवांवर विश्वास ठेवू नका:- बोरघरे वनविभाग अधिकारी याचे नागरिकांना आव्हान

0
1073
Google search engine
Google search engine

माधान येथे वाघ दिसल्याची चर्चा,वन विभाग व पोलीस प्रशासन शोधात.
अफवांवर विश्वास ठेवू नका:- बोरघरे वनविभाग अधिकारी याचे नागरिकांना आव्हान

चांदूर बाजार :-प्रतिनिधी
तालुक्यातील माधान शेत शिवारात कापूस वेचणी करिता गेलेल्या महिला मजुरांना वाघाचे दर्शन झाल्याने माधान वासी धास्तावले होते. गावात वाघ शिरल्याची चर्चा तालुकाभर आगीसारखी पसरली होती. घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस प्रशासन व वनविभागाचे कर्मचारी वाघाच्या शोधात होते. मात्र जंगलात मिळालेल्या पायाचा ठसा वरुन सदर जनावर वाघ नसल्याची प्राथमिक अंदाज वनविभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका असे आव्हान वनविभाग अधिकारी बोरघरे यांनी केले आहे.
गेल्या तीन आठवड्यांपासून अमरावती जिल्ह्यात नर्भक्षी वाघ शिरल्याची चर्चा सातत्याने सुरू आहे. अशातच आज सकाळी नऊच्या दरम्यान चांदुर बाजार तालुक्यातील माधान येथील शेतकरी रघुनाथ मोहोड यांच्या शेतात कापूस वेचणी करिता 10 ते 12 महिला मजूर गेले होते. विचित्र प्रकारचा आवाज येत असल्याने महिलांनी कापूस वेचणी थांबविले.इकडे तिकडे शोध घेतला असता त्यांना या शेता लगतच असलेले भीमराव मेश्राम यांच्या शेतातील आंब्याच्या झाडावर वाघ असल्याचे काही महिला मजुरांना निदर्शनास येताच त्यांनी तिथून पळ काढला. व सदर घटना त्यांच्या शेतात असलेल्या रखवालदाराला सांगितले. या घटनेची माहिती आगीसारखी तालुकाभर पसरली. घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस निरीक्षक अजय आखरे तत्काळ माधान शेतशिवरत दाखल झाले.
पोलीस निरीक्षक अजय आखरे यांनी महिला मजुरांची चौकशी केल्यानंतर वनविभागाला याची माहिती दिली. यावेळी शिरजगाव कसबा येथील वनपाल गणेश सिंग ठाकूर घटनास्थळी दाखल झाले. मजुरांनी दिलेल्या माहितीनुसार त्या शेतशिवारात वनविभागाने पाहणी सुरू केली. या शेतात काही ठिकाणी ओलित सुरू असल्याने सदर जनावरांचे पायाचे ठसे आढळून आले आहे. तर या पदचिन्ह वरून सदर प्राणी हा वाघ नसल्या अंदाज वनपाल सिंग ठाकूर यांनी व्यक्त केला.
मात्र महिला मजुरांनी बघितलेल्या वाघाच्या चर्चा मुळे माधान, काजळी, ब्ब्राह्मणवाडा थडी, देऊरवाडा, ब्राह्मणवाडा पाठक, सोनोरी या परिसरात चर्चेला ऊत आले होते. तर या चर्चेमुळे शेतमजुरीकरिता गेलेला मजुरवर्ग दहशतीमुळे घराकडे परतला आहे. माधान शिवारात वाघ असो वा नसो मात्र या भागात वाघाची दहशत मात्र निर्माण झाली आहे. त्यामुळे वनविभागाने यामधील सत्य पडताळणी करणे गरजेचे आहे.