सामाजिक सौहार्द यासह वंचितांच्या आनंदासाठी ही दिवाळी साजरी करण्याचे ठाणेदार गजानन शेळकेंचे आवाहन

0
967
Google search engine
Google search engine

अकोट संतोष विणके

दिवाळी हा सणांचा राजा घरोघरी आनंदाचे उधाण बाजारात चहूकडे गर्दीचा जनसागर जनतेने हा आनंद साजरा करावा म्हणून पोलीस या गर्दीतही आपल्या कुटुंबापासून दुर राहून कर्तव्य बजावतो संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोट शहरात शांतता नांदावी म्हणून शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजानन शेळके यांनी अनेक सामाजिक प्रयोग राबवले आहेत .त्यांच्या प्रयत्नांना जनतेनेही प्रतिसाद दिला आणि या शहरात कावड उत्सव गणेशोत्सव दुर्गोत्सव दसरा सण शांततेत धुमधडाक्यात साजरे झाले तसेच दिवाळीत कधी नव्हे ते ट्रॅफिक जामचे समस्या सुटल्या सामान्य नागरिकांनी पोलिसांच्या बंदोबस्तात जाम कौतुक केले एकंदरीतच पोलिसांच्या दृष्टीने आव्हानात्मक असणारे आकोट ठाणेदार गजानन शेळके यांनी आपल्या सामाजिक संवेदनशीलतेने शहर वासीयांची मने जिंकली यात तिळमात्र शंका नाही.

दरम्यान सामाजिक सौहार्द यासह वंचितांच्या आनंदासाठी ही दिवाळी साजरी करण्याचे आवाहन ठाणेदार गजानन शेळकें यांनी केले आहे.याआधी ही ठाणेदार शेळके यांनी वृद्ध निराधार महीलेचे पुनर्वसन,गरीब अॉटोचालकाला मदत तथा अनेक सेवाभावी कार्य करत जनतेच्या मनात पोलीसांची प्रतीमा उजळ केली आहे.याप्रसंगी त्यांनी शहरवासीयांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा दिल्या आहेत.