मराठी जनांच्या हक्कांसाठी मनसे राबवत आहे विविध उपक्रम

128

आकोट/संतोष विणके

महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी सतत लढा पुकारणारा पक्ष असून या अंतर्गत मनसेचे युवा कार्यकर्ते सुरज वर्मा अनेक उपक्रम सातत्याने राबवत आहेत.याआधी त्यांनी महाराष्ट्रातील मराठी पुत्रांसाठी मोफत तत्त्वावर शालेय व महाविद्यालयीन प्रवेशाला लागणारी शासकीय दाखले बनवण्यासाठी मोफत सेवा दिली आहे.

तर दहावी व बारावीच्या परीक्षार्थ्याना त्यांनी निकालाची प्रत मोफत वाटप केली आहे. महाराष्ट्राच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण जनतेने एकत्र येत राज साहेबांना भरघोस पाठिंबा देण्याचे त्यांनी आव्हान केले असून दिवाळीनिमित्त अकोट तालुका तथा शहर वासीयांना व तमाम महाराष्ट्रीयन जनतेला त्यांनी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत