दिवाळीच्या आगमनासोबतच शहरवासीयांना लागले नरसिंग महाराज यात्रेचे वेध

218

अकोट/संतोष विंणके

दिवाळी होताच पडणारी गुलाबी थंडी व या थंडी सोबत शहराचे ग्रामदैवत नरसिंग महाराजांची येणारी यात्रा.दिवाळी येताच शहरवासीयांना आता यात्रेचे वेध लागले आहेत.या यात्रेला दिवाळीला माहेरी येणाऱ्या मुली या आवर्जून येतात. नरसिंग मंदिराचा परिसर या यात्रेने गजबजून जातो. महाराजाची यात्रा ही आकोट वासीयांसाठी अध्यात्मीक आनंद देणारी असल्याचे नगरसेवक ॲड.योगैश पुराडउपाध्ये यांनी सांगीतले.

तसेच यात्रेच्या दहीहंडी उत्सवाला सोमवारवेस शनिवारा मोठी मढी आदी भागातुन मोठ्या प्रमाणावर भावीक येतात अशी माहिती युवा सामाजिक कार्यकर्ता सागर बोरोडे यांनी सांगीतले.दरम्यान या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम सभापती ॲड.योगैश पुराडउपाध्ये व सागर बोरोडे यांनी समस्त जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.