उद्योजक मोरे यांच्या पत्नीला 25 कोटी खंडणीची मागणी पतीचा भुजबळ करण्याची दिली धमकी

1721

उस्मानाबाद .- मी महिला आयोगातून बोलतोय, तुमच्या पतीविरुद्ध रेखा मोरे (रेखा भालशंकर ) यांची तक्रार आली आहे. प्रकरण तडजोडीने मिटवायचे असेल तर आठ लाख रुपये द्या, अन्यथा मिडियात तुमच्या पतीची व तुमची बदनामी करू, काही राजकीय नेत्यांमार्फत काय करायचे ते करू, अशी धमकी देणाऱ्या बाळराजे तौर-पाटील व रेखा भालशंकर यांच्याविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कसबे तडवळे येथील युवा उद्योजक देवदत्त मोरे व त्यांच्या पत्नी अर्चना मोरे यांच्याबद्दल तसेच त्यांनी दत्तक घेतलेल्या मुलीबद्दल रेखा भालशंकर हिने फेसबुकवर बदनामीकारक मजकूर पोस्ट केला होता. 1 ते 4 नोव्हेंबर या कालावधीत महिला आयोगातून बाळराजे तौर-पाटील बोलतोय म्हणून अर्चना मोरे यांना फोनवर धमकीचे फोन आले होते. महिला आयोगाकडे रेखा यांनी तक्रार दिली आहे. आम्हाला तुमच्याविरुद्ध कारवाई करावी लागेल. तडजोड करून प्रकरण मिटवायचे असेल तर पैसे द्यावे लागतील, तुमचे पती मुख्यमंत्र्यांना जरी भेटले तरी ते काहीही करू शकणार नाहीत. राष्ट्रवादीचे राणाजगजीतसिंह पाटील, अर्चनाताई पाटील, सक्षणाताई सलगर यांच्यामार्फत तुम्हा पती-पत्नीचे अवघड करीन. तुमच्या पतीचा भुजबळ करून जेलमध्ये टाकू, उस्मानाबाद मध्ये फिरू देणार नाही ,मीडिया मध्ये बदनामी करू ,तेंव्हा तडजोड करायची असेल तर रेखा आणि आम्हाला हवी ती रक्कम द्या, अशा शब्दात धमकी देऊन खंडणीची मागणी केल्याप्रकरणी रेखा भालशंकर, व बाळराजे पाटील यांच्याविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

जाहिरात
नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।