प.वि.पाटील व ए. टी. झांबरे विद्यालयात – ‘विद्यार्थी दिन’  तसेच  ‘दिपोत्सव’  आनंदात साजरा

0
986
Google search engine
Google search engine

के.सी.ई.सोसायटी च्या गुरुवर्य प.वि.पाटील व ए. टी. झांबरे विद्यालयात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनाचे व दिवाळी उत्सवाचे औचित्य साधून ‘ विद्यार्थी दिन’ तसेच ‘दिपोत्सव’मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम प.वि.पाटील विद्यालयाच्या मुख्या.सौ.रेखा पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाचे मुख्या.दिलीपकुमार चौधरी यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
आज दिवाळी म्हणजेच दिपोत्सव तथा दिपदानोत्सव दिवस , आजच्या दिवशी आपण आपल्या जीवनातील अंधकार दूर करून आनंद ,ज्ञान , समृद्धी ,प्रगती व आरोग्य मिळो अशी आपण प्रार्थना करतो.लक्षदीप लावून अंधकार दूर करतो हा अंधकार आपण ज्ञानाच्या रूपाने दूर करू शकतो.
ज्याप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः आजीवन विद्यार्थी राहून स्वतःचे तथा अखंड समाजाचे मार्गदर्शक व प्रकाशक झाले त्याप्रमाणे आपण सुद्धा ज्ञानार्जन करून समाजात असलेला अंधकार दूर करु शकतो. शिक्षण हेच आपल्या उन्नतीचे एकमेव साधन आहे अशा शब्दात उपशिक्षक योगेश भालेराव यांनी आपले विचार व्यक्त केले.
त्याचप्रमाणे दिवाळी ही फटाकेमुक्त व प्रदूषण मुक्त साजरी करण्याचा संकल्प करण्यात आला.दिव्यांची आरास लावून दिपोत्सव साजरा करण्यात आला.प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.