सह्याद्री फाऊंडेशनची पालावर दिवाळी साजरी ; डाँ दिग्गज दापके-देशमुख यांची ऊसतोड मजूरासोबत दिवाळी

261

सह्याद्री फाऊंडेशनची पालावर दिवाळी साजरी

उस्मानाबाद – कष्टकरी व वंचितांच्या जीवनात आनंद निर्माण करणे हिच खरी दिपावलीडॉ. दापके-देशमुख दिग्गजसर्व साधारणपणे कुटुंबासोबत, मित्र मंडळीच्या भेटी घेत व त्यांना शुभेच्छांचे आदान-प्रदान करीत तसेच दिवाळी पहाट सारख्या संगीत मैफलींना हजेरी लावत दिवाळी साजरी करण्याची पद्धत आहे.मात्र याला छेद देत, सह्याद्री फाऊंडेशन्स उस्मानाबाद वतीने रुईभर ता.उस्मानाबाद येथे, उस तोडणीसाठी आलेल्या 30 कुटुंबातील 90 सदस्यांसोबत, सामाजिक ठेऊन संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. दापके-देशमुख दिग्गज व सचिव प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. वसुधा दिग्गज दापके-देशमुख यांनी त्यांना मिठाई, फराळ आकाशकंदील व पणती इ.वस्तुंचे वाटप केले.ऊसतोड कामगारस्वतःच्या घरादारापासून लांब पोटाची खळगी भरण्यासाठी हातावर पोट घेवून उसाच्या फडात कोयता चालवणाऱ्या कुटुंबामध्ये आनंदाचे क्षण पेरण्याच्या छोटासा प्रयत्न.त्यांच्या चेहऱ्यावर सुखाचे भाव उमटल्याचे पाहणे हाच दिवाळीचा आनंद असल्याचे देशमुख दांपत्याने व्यक्त केलेया कार्यक्रमासाठी सह्याद्री चे गजानन पाटील, अभिजित माने,परमेश्वर माने,शिवाजी जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।