माळशिरस पंचायत समिती मध्ये ४१ लाख रुपयांचा शौचालय अनुदानात घोटाळा केल्या प्रकरणातील लिपिक राहूल ढवणे यास आटक

213

माळशिरस पंचायत समिती मध्ये ४१ लाख रुपयांचा शौचालय अनुदानात घोटाळा केल्या प्रकरणातील लिपिक राहूल ढवणे यास आटक

उस्मानाबाद – माळशिरस पंचायत समिती मध्ये ४१ लाख रुपयांचा शौचालय अनुदानात घोटाळा केल्या प्रकरणातील लिपिक राहूल ढवणे यास माळशिरस पोलिसांनी रांजणगाव (पुणे ) येथून अटक केली असून तो गेले चार महिन्यापासून फरार होता – माळशिरस पंचायत समिती मधील कनिष्ट सहाय्यक राहुल मारुती ढवणे याने शौचालय अनुदानाचा ४१ लाख ६४ हजार रुपयांचा अपहार केल्या बद्दल माळशिरस पोलिसात गुन्हा दाखल झाला होता .गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता .परंतु पोलिसांनी दोन पथके तयार करून व खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहिती वरून रांजणगाव जि पुणे येथे त्याला काल ताब्यात घेऊन आज न्यायालयात हजार केले असता त्याला न्यायालयाने ६ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे .

राहुल ढवणे माळशिरस पंचायत समिती कार्यालयात कनिष्ट सहाय्यक म्हणून कार्यरत होता .शौचालयाचे अनुदान लाभार्थीच्या खात्यावर जमा करण्याचे काम तो पाहत होता.त्याने मार्च २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत शौचालय अनुदानाचे ४१ लाख ६४ हजार रक्कमेचे धनादेश लाभार्थीच्या खात्यावर न भरता स्वताच्या खातेवर जमा केले व ते करीत असताना त्याने स्वताच्या बँक खाते नंबरचे बनावट शेडयुल्ड तयार करून सदर शेडयुल्ड वर गट विकास अधिकारी माळशिरस यांचा शिक्का मारून त्यावर बनावट सही करून बँकेत सादर करून त्यांची दिशाभूल करून लाभार्थीची रक्कम स्वताच्या बँक खात्यावरती जमा करून घेतली. याबाबत तत्कालीन गट विकास अधिकारी सुरेश मारकड यांनी माळशिरस पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

या शौचालय घोटाळा प्रकरणी जि .प मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड यांनी चौकशी करून तत्कालीन गटविकास अधिकारी सुरेश मारकड यांना निलंबित केले आहे .गुन्हा दाखल झाल्या पासून पोलीस त्याच्या शोधात होते .परंतु तो सापडत नव्हता ,त्याच्या भ्रमणध्वनीचे लोकेशन सातत्याने बदलत असल्याने त्याला पकडणे शक्य होत नव्हते .पोलीस अधीक्षक मनोज पाटील ,उपाधीक्षक मिलिंद मोहिते ,उप विभागीय अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची दोन पथके त्याच्या तपासासाठी करण्यात आली होती ,या पथकांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहिती वरून व त्याने स्वताचा भ्रमणध्वनी सुरु केल्यामुळे त्याचे ठिकाण पोलिसांना समजले त्यावरून पोलिसांनी त्यास रांजणगाव पुणे येथे ताब्यात घेतले .त्यास ताब्यात घेतल्याने या प्रकरणात अजून कोण कोण सामील आहे हे समजणार आहे . पोलीस निरिक्षक.विश्मबर गोल्डे ,फौजदार प्रमोद सुर्वे ,सुयोग वायकर ,पोलीस हवालदार समीर पठाण ,विक्रम घाडगे ,अमोल बकाल ,राहुल रूपनवर ,सचिन हेंबाडे,समाधान शेंडगे यांच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।