*श्नमिक मुक्ती दलामुळेच धरणग्रस्त व दुष्काळग्रस्त लोकांना न्याय मिळाला आहेःभारत पाटणकर!!

सांगली न्युज: श्रमिक मुक्ती दल गेली तीस वषै झाली. धरणग्रस्त व सांगली,सातारा जिल्ह्यातील दुष्काळ ग्रस्त शेतकरी यांच्या साठी गेली तीस वषै झाली काम करीत आहे.आज ताकारी व टेंभू योजनेचे पाणी या भागात मिळत आहे .हे चळवळीचेच यश आहे. असे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे राज्य अध्यक्ष डाँ.भारत पाटणकर यांनी केले. राजलक्ष्मी मल्टीपर्पज हाॅल कडेपूर ता.कडेगाव येथील टेंभू व ताकारी योजनेच्या लाभ क्षैत्रातील शेतकरी आणि पाण्यासाठी त्याग करणारे धरणग्रस्त यांच्या सलोखा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्य निमंत्रक मोहनराव यादव काका, संचालक दिलीप पाटील, सौ.पाटणकर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक संचालक दिलीप पाटील यांनी केले. पुढे बोलताना डाँ.भारत पाटणकर म्हणाले की आज १६०० धरणग्रस्तांच्या पैकी १४५० धरणग्रस्तांना जमीन वाटपाचे काम झाले आहे. जे माझ्या बरोबर होते त्या सर्व धरणग्रस्त शेतकरी व कष्ट करी यांना शंभर टक्के न्याय देण्याचे काम केले आहे.आजही ज्या लोकांनी शासनाच्या कडून पैसे घेतले आहेत.अशांनी पासष्ट टक्के पैसे परत करा त्यांना ही शेत जमीन मिळवून देवू चुकली असले तरी तेही आपलेच लोक आहेत. मात्र माझ्या नसल्याने काहीना नक्की च पश्चाताप होत आहे.मी समाजसेवक आहे.चुकलेली माणसे पुन्हा बरोबर घेवून काम करु. नवजीवन उत्सवातील काही गुंड व दलाल लोकांनी धरणग्रस्त लोकांना पैसे घेऊन त्यांचे वाटोळे झाले. पैसे कोणाकडे शिल्लक राहिले नाहीत.धरणग्रस्त लोकांच्या संपूर्ण शेत जमीनीस पाणी मिळाला शिवाय या भागातील पाण्यासाठी चा आपला लढा थांबणार नाही. गेली तीस वषै झाली पाणी चळवळीचा लढा सुरु आहे.समान पाणी वाटप,राज्य सरकारने समान पाणीपटटी याबाबतीत चळवळ सुरू आहे. या बरोबरच ८१ टक्के शासन व १९ टक्के शेतकरी वीज बिल हे आमच्याच चळवळीचे यश आहे असे शेवटी ते म्हणाले.श्रमिक मुक्ती दलाचे राज्य निमंत्रक मोहनराव यादव आपल्या भाषणात म्हणाले की आज दुष्काळी भागातील शेतकरी व धरणग्रस्त यांना न्याय देण्याचे काम डाँ.भारत पाटणकर यांनी केले आहे.आज धरणग्रस्त लोकांना प्रत्यक्ष आपल्या नावावर झालेला सातबारा देण्याचे एक आदर्श काम होत आहे.यामुळे धरणग्रस्त लोकांना सातबारा व या ठिकाणी ज्यांनी जमीनी दिल्या त्या दानशूर शेतकरी यांचा सत्कार असा दुहेरी संगमाचा कार्यक्रम होत आहे. दुष्काळी भागातील शेतकरी व धरणग्रस्त यांनीही न्याय डाँ.भारत पाटणकर. यांच्या मुळेच मिळाला आहे.आज घाटमाथ्यावर पाणी आल्य ने दुष्काळाच्या झळा कमी बसत आहेत. यावेळी सुरेश पाटील, दिलीप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास यावेळी रमेश कणसे,सुषमा कणसे,मारूती लोहार, अशोक निवडुंगे,आनंदा भिंगारदेवे,भाऊसाहेब यादव,महादेव यादव,लालासाहेब. यादव,बाळासाहेब जाधव,मालन हारुगडे,शिवाजी मदने, भरत मोहिते, महादेव मोहिते, मधुकर कांबळे यांच्या सह टेंभू व ताकारी योजनेच्या कार्यक्षैत्रातील धरणग्रस्त व शेत जमीन दिलेले शेतकरी व महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.आभार दिलीप पाटील यांनी मानले. ः* टेंभू व ताकारी योजनेच्या लाभ क्षैत्रातील धरणग्रस्त लोकांना प्रत्यक्ष सातबारा वाटप कार्यक्रमात बोलताना डाँ.भारत पाटणकर व्यासपीठावर मोहनराव यादव,दिलीप पाटिल, सौ.पाटणकर व मान्यवर.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।