द पॉवर ऑफ मिडिया फाउंडेशनचा तेजोत्सव उपक्रम – मिडिया प्रतिनिधींच्या उपस्थितीत दिवाळी आंदोत्सव साजरा

0
770
Google search engine
Google search engine

अमरावती :

बालगोपाल, वूद्ध, रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना केले फराळाचे वाटप.

समाजात असे अनेक व्यक्ती दिसतात जे दिवाळीचा आनंदाचा सण साजरा करण्यापासून वंचित असतात, त्यांच्या जीवनात देखील दिवाळी आनंदाने साजरी होणे गरजेचे आहे. हे लक्षात घेता -ते मुलं कशी दिवाळी साजरी करत असतील ज्यांच्या नशिबी आई-वडिलांचं प्रेमच नाही. अर्थातच आम्ही बोलतोय अनाथालयातील मुलांबद्दल यासोबतच परिवारातील सदस्यांपासून कोसो दूर असलेल्या वृद्धाश्रमातील वृद्धाबद्द्ल तथा हॉस्पिटलमधील रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांनाबद्दल, विकासापासून दूर असलेल्या तांडा वस्तीतील नागरिकांबद्दल? खरचं परिस्थिती खूपच गंभीर अवस्थेतेत पाहायला मिळते, म्हणूनच द पॉवर ऑफ मिडिया फाउंडेशन व सातपुडा युथ फाउंडेशनच्या पदाधिकारी व सभासद सदस्यांना पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश लोटे यांनी एकत्र करून कार्याक्रमाचे नियोजन केले होते. “देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे” यावृत्तीतून त्यांनी यावर्षीचा दिवाळी मिलन कार्यक्रम काही वेगळ्या पद्धतीने साजरा व्हावा व वंचितांना आपलं काही देणं लागत ह्या हेतूने साध्य व्हावा म्हणून सदाशांती बालगृह अनाथालयातील बालगोपाल, आदिवासी बांधव, तसेच इर्विन, डफरिन, व सुपर स्पेशालिस्टी हॉस्पिटलमधील उपचार घेत असलेले रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक तसेच मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना दिवाळी भेट म्हणून फराळ व मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी मिडिया प्रतिनिधी व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत “दिवाळी आंदोत्सव” मोठ्या उत्साहात पार पडला.

दिवाळी फराळ व मिठाईचे वाटप द पॉवर ऑफ मिडिया फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर आबिटकर, उपाध्यक्ष एम.डी.चव्हाण, सचिव अनिल कदम, कार्याध्यक्ष तानाजीराजे जाधव, सदस्य ईश्वर हुलवान, मधुकर गलांडे, राजू जवंजाळ, ताज्जुद्दिन शेख, कुलभूषण महाजन, कांचन जांबोटी यांच्या आदेशावरून संघटनेचे संस्थापक सदस्य तथा राज्य संघटक संदीप बाजड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी राज्य महिला सदस्या अनिता काळे (बाजड), जिल्हाध्यक्ष उमेश लोटे, अव्दैत कन्सल्टन्सीचे संचालक अव्दैत चव्हाण, विदर्भ सदस्य उमेश जयस्वाल, जिल्हा उपाध्यक्ष वकील भूषण काळे, देविदास सूर्यवंशी (मामा), सरचिटणीस सुभाष कोटेचा, जिल्हा सदस्य सुरेंद्र बिसने, धीरज मानमोडे, सभासद पद्माकर मांडवधरे, अंकित कोहळे, प्रवीण सराटे, गोपाल मानकर, यश चौधरी, डॉ.शुभम गुल्हाने भूषण यादगिरे, निखील जोशी, शुभम बानुवाकोडे, केशव देशपांडे यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर पहिल्या दिवसापासून द पॉवर ऑफ मिडिया फाउंडेशन व सातपुडा युथ फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमातून सदाशांती बालगृह अनाथालयातील बालगोपालांच्या ज्ञानांत अधिक भर पडावी म्हणून चित्रकला स्पर्धा व संगीत खुर्चीसह मुलामुलींसाठी विविध खेळांचा समावेश करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सरतेशेवटी नांदगाव खंडेश्वर येथील शिक्षक व संघटनेचे सभासद पदमाकर मांडवधरे यांच्याकडून सर्व बालगोपालांना भेटवस्तू प्रदान करीत दिवाळीच्या शुभेछ्या दिल्या, त्यासोबतच नांदगावपेठ येथील तांडा वस्तीतील आदिवासी बांधवांना फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच जिल्हा सामान्य ग्रामीण रुग्णालय (इर्विन), जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरिन) व सुपर स्पेशालिस्टी हॉस्पिटलमधील उपचार घेत असलेले रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना हा दिवाळी सण साजरा करू शकले नाही, २०० पेक्षा अधिक स्त्री-पुरुष रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना पत्रकार संघटनेच्यावतीने भाऊबीज या सणाला दिवाळी भेट स्वरूप म्हणून फराळ व मिठाईचे वाटप केले. त्यासोबतच अमरावतीपासून काही अंतरावर असलेल्या भानखेडा (माळखेडा) येथील मातोश्री वृद्धाश्रमात संघटनेच्या पदाधिकारी व सभासदांनी वृद्ध स्त्री-पुरुषांना भेट वस्तू देत संवाद साधला व आपलस करून घेतलं, अक्षरशः शुभद्राबाई उगले हि म्हातारी ९४ वर्षाची असून टी जास्त शिकलेली नाही, फक्त बाराखडी शिकलेली आहे. “दृढविश्वास आणि मनात केलेला निश्चय” माणसाला सार्थकी ठरविते हे या शुभद्राबाईच्या नित्यक्रमातून दिसून येते, आजी ९४ वर्षाची असली तरी आजही स्वतः विहिरीवरून पाणी ओढून आणते, व आजच्या दिवसातही स्वतःचे कामे स्वतःच करते. याला जिद्द व चिकाटी अपवाद नाहीच. शुभद्रा आजीचं जुन्या काळातील बाराखडी शिक्षण म्हणजेच काहीच शिक्षण नाही, मात्र असं असल तरी त्या आजीने ज्ञानेश्वरी, महारामायण, भगवतगीता, ग्रामगीता सारखे अनेक पुस्तके वाचून काढलीत, आजही आजीला नवनवीन धार्मिक पुस्तके वाचावीत असे वाटते, या वाचनीय पुस्तकातून आजी वृद्धाश्रमातील महिलांना आजही शिक्षणाचे धार्मिक धडे देऊन इतरांना हि शिक्षण घेण्यासाठी प्रेरित करीत असते, अशा आजीचा सहवास व तिच्याशी गप्पागोष्टीत सभासद मग्न झाले होते.

समाजासाठी चांगला संदेश -श्री किशोर आबिटकर

“द पॉवर ऑफ मिडिया फाउंडेशन” तर्फे दिवाळीनिमित्त बालगृहातील मुला-मुलींना तर वृद्धाश्रमातील वृद्धांना व तांडा वस्तीतील आदिवासी कुटुंबांना तसेच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना फराळाचे वाटप केले जात आहे. हा उपक्रम आमच्यासाठी फार मोठी मदत व चांगला संदेश देऊन जाणारा आहे. फराळ महत्वाचा आहेच. पण त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीची भावना देखील तेवढीच महत्वाची आहे. द पॉवर ऑफ मिडिया फाउंडेशन या पत्रकार संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी ही भावना जपली आहे. हा समाजासाठी चांगला संदेश असून पत्रकारांनी मोठ्या हिरारीने अशा कार्यक्रमात नेहमीच पत्रकारिता बाजूला सारून सहभागी व्हायला पाहिजे अशी प्रतिक्रिया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर आबिटकर यांनी मिडिया प्रतिनिधींशी दूरध्वनीवरून बोलतांना सांगितले.