उस्मानाबाद- सुतळीबाँम्ब भांडणात अंगावर फेकला ; लहान मुलगा गंभीर

0
955
Google search engine
Google search engine

उस्मानाबाद- ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा व मांगल्याचा तेजोत्सव म्हणजे दिवाळी, या उत्सवात प्रत्येक जन एकमेकांचे हित चिंतत असतो परंतु उस्मानाबाद जिल्ह्यातील कौडगाव तांड्यावर मात्र एका अल्पवयीन मुलाच्या अंगावर फटाके फोडून जुन्यावादाचा बदला घेण्याचा दुर्दैवी प्रकार घडला आहे. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला असून तो एक खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.उस्मानाबाद तालुक्यातील कौडगाव तांड्यावरची हि घटना असून काही दिवसापूर्वी या तांड्यावरील दोन कुटुंबात लहान मुलांच्या भांडणावरून गेल्या काही दिवसापासून भांडण सुरु होती,दोन्ही कुटुंब मोलमजुरी करून गुजराण करणारे आहेत. दिवाळीच्या पहिल्या पाण्याच्या दिवशी दिनेश राठोड हा ११ वर्षीय मुलगा तांड्यावरील शाळेच्या समोर इतर मुलांसोबत खेळत होता त्यावेळी राजू राठोड नावाच्या व्यक्तीने अचानक त्याच्या दिशेने सुतळीबॉम्ब फेकला आणि दिनेशने त्याचा झेल घेतला हा बॉम्ब त्याच्या हातात फुटला यामुळे त्याच्या उजव्या हाताची चार बोट छिन्नविछिन्न झाली तर पोट आणि चेहऱ्यावर जखमा झाल्या त्यानंतर त्याला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्याची गंभीर परिस्थिती पाहून शहरातील डॉ सुधीर शिंदे यांच्या सुपर स्पेशालिटी प्लास्टिक सर्जरी नोबेल हॉस्पिटल मध्ये हलवण्यात त्याठिकाणी त्याच्यावर उपचार करण्यात आले.त्याच्या चारही बोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

हि घडलेली घटना वेदनादायी आहे,असे अनुचित प्रकार थांबावे आणि प्रदूषण होऊ नये म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने या उत्सवाच्या काळात फटाके फोडण्यासाठी बंदी घातली आहे आम्ही गेली तीस वर्षे फटाकेमुक्त अभियान राबवत आहोत अशा आनंदोत्सवाच्या या काळात कुणाच्या जीवावर हे फटाके बेतू नये म्हणून सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे फटाक्यांचा अशा पद्धतीने हिंसक वापर होत असेल तर फटाके फोडणे कायमचे बंद करणे सर्वांच्या हिताचे ठरणार असल्याचे अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे जिल्हा सचिव चंद्रकांत उळेकर यांनी या घटने विषयी प्रतीक्रिया दिली.