धाडसी तरुणींच्या सतर्कतेने आकोट शहर पोलीसांनी पकडला अट्टल घरफोड्या

0
1945
Google search engine
Google search engine

चोरट्याकडुन हजोरो रुपायांचा मुद्देमाल जप्त

आकोट/प्रतीनीधी

पोलीस आणि जनता सतर्क असली की गंभीर गुन्ह्यावर सुद्धा नियंत्रण ठेवता येते हे अकोट शहरात दिसून आले,शहरातील नया प्रेस भागातील दोन धाडसी युवतींच्या सतर्कतेने हे दिसुन आले.काल दिनांक 10।11।18 रोजी सकाळी एक चोरटा अकोट शहरातील नया प्रेस भागातील विजेंद्र रामराव काकडे ह्यांचे घरा मध्ये घुसला, आवाजा मुळे त्यांच्या घरा मध्ये झोपलेल्या दोन तरुण मुली जाग्या झाल्या त्यांनी आरडा ओरड केली असता चोर पळायला लागला, यावेळी या धाडसी मुलींनी न घाबरता त्याचे मागे लागल्या त्या मुळे तो चोर बाजूच्या नाली मध्ये पडला, लगेच ह्या दोन्ही धाडसि मुलीं त्याचे वर तुटून पडल्या, त्यांनी त्याची कॉलर व हात पकडून आरडा ओरड केल्याने विजेंद्र काकडे हे धावून आले, त्यांनी लगेच पोलिस स्टेशनला फोन केला ,5 मिनिटातच त्या भागात गस्तीवर असलेले अकोट शहर पोलिस स्टेशनचे कर्मचारी वीरेंद्र लाड, गोपाल बुंदे तेथे पोहचले, दरम्यान यावेळी बाजूचे नागरिक आकाश बंकुवाले, रामा देवरे, सुनील ठाकरे हे सुद्धा पोहचले सर्वांनी त्याला पोलिस स्टेशनला आणले

, त्याची झडती घेतली तेव्हा त्याचे जवळ सोन्या चांदीचे किरकोळ दागिने व नगदी 823 रुपये मिळाले, रविंद्र काकडे ह्यांनी दिलेल्या चोरीच्या फिर्यादी वरून पकडण्यात आलेला इसम ज्याने त्याचे नाव आजाब राव सखाराम गवई रा. हातरुन पोलिस स्टेशन उरळ असे सांगितले, यावेळी तपासा मध्ये सदर चोराने विजेंद्र काकडे ह्यांचे घरा शेजारी राहणारे विलास जनार्दन खारोळे ह्यांचे घराचे कुलूप तोडून चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले

दोन्ही घर मिळून सोन्या चांदीचे किरकोळ दागिने व नगदी 823 रुपये असे 18,762 रुपयांचा मुद्देमाल घरफोड्या कडून जप्त करण्यात आला आहे, दोन धाडसी तरुण मुलींच्या व नागरिकांच्या सतर्कते मुळे एका अट्टल घरफोड्याला अटक झाल्याने त्यांचे कौतुक होत आहे, ह्या दोन्ही तरुण धाडसी मुलींचे लवकरच पोलिस निरीक्षक गजानन शेळके सत्कार करणार आहेत.

दरम्यान नागरिकांनी सतर्क राहून पोलिसांना मदत केल्यास गंभीर गुन्ह्याला आळा बसू शकतो असे आवाहन सुद्धा त्यांनी केले, पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे ,पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शना खाली हेड कॉन्स्टेबल सारंगधर भरसाकळे, पोलिस कर्मचारी सचिन सोनटक्के,वीरेंद्र लाड,गोपाल बुंदे, सुनील नागे हे करीत आहेत.