एक दिवा आनंदाचा… भुमिने साजरे केले आदिवासी बांधवांसोबत दीपपर्व

0
2158
Google search engine
Google search engine

महादान मोहीमेंतर्गत केले फराळ व कपड्यांचे वाटप

आकोट/संतोष विणके

सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या भूमी फाउंडेशन ने दरवर्षी प्रमाणे यावेळी ही आदिवासी गावांमध्ये जाऊन दिवाळी तथा भाऊबीज साजरी केली,गरजवंताच्या,आरोग्य साठी,शिक्षणासाठी,विविध समस्या चे निवारण करण्यासाठी भूमी फाऊंडेशन ने दिपउत्सव चिपी गायरान,कर्ही रुपागड या अदिवासी गावात भूमी फाऊंडेशनचा दिप पर्व साजरा करण्यात आला.

तेल्हारा तालुक्यातील गायरान तथा करी रुपागड या गावात यंदा भूमिच्या वतीने दिनांक 10 नोव्हेंबरला दिपपर्व हा उपक्रम पार पडला, यावेळी महादान मोहीमेतुन मिळालेले कपडे साड्या लहान मुलांच्या ड्रेसचे गरजूंना मोफत वाटप करण्यात आले.यात गायरान येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात गावकऱ्यांसोबत दिपपर्व साजरे करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष पालक मार्गदर्शिका सौ प्रितीताई गजानन शेळके, ग्रामपंचायत सदस्य रमेश केदार भुमीचे अध्यक्ष तुषार अढाऊ, चंचल पितांबरवाले,शिल्पा राठी,यांच्या हस्ते साडी वाटप करण्यात आले.त्यासोबत शालेय विद्यार्थी व मुलींना देखील ड्रेस देण्यात आले यावेळी सर्व गावकऱ्यांना फराळ देण्यात आला त्यानंतर तेल्हारा तालुक्यातून प्रथम आलेल्या करी रुपागड गावात संध्याकाळी दिपपर्व साजरे करण्यात आले

दरम्यान संपूर्ण गाव दिव्यांच्या प्रकाशाने उजळुन निघाले होते तर गावातील घराघरांसमोरची दिव्यांची आरास ही लक्ष वेधून घेत होती.यावेळी गावातील मारुती मंदिरा जवळील चौकात गरजूंना साडी वाटप लहान मुलींना कपडे वाटप सौ प्रीतीताई गजानन शेळके ग्रामपंचायत सदस्य अनिल भारसाकळे तुषार अढाऊ,चंचल पितांबरवाले,यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.तसेच यावेळी गावकऱ्यांना फराळ वाटप देखील करण्यात आले

तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष विणके सुनील मस्करे यांनी केले व आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य अनिल भारसाकळे यांनी केले. कार्यक्रमाला भूमी फाऊंडेशनचे विशाल राठोड कमलेश राठी,पंकज आंबुलकर सुनिल मस्करे,अजहर खान, संतोष विणके ,आकाश धुमाळे, शिल्पा राठी, पूजा पितांबरवाले ,अक्षय जायले रित्विक शेळके स्वराली शेळके यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले