धनगर आरक्षणासाठी राज्यव्यापी पिवळं वादळ धडक मोर्चात सहभागी व्हा – सतीश हांडे

0
1086
Google search engine
Google search engine

अकोट/संतोष विणके

धनगर आरक्षणाचा मागणीसह इतर मागण्या च्या समर्थनार्थ औरंगाबाद येथे दिनांक 13 नोव्हेंबरला राज्यव्यापी पिवळं वादळ धडक मोर्चा आयोजित केला आहे.या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हान सकल धनगर समाज धडक मोर्चाचे विदर्भ समन्वयक सतिष हांडे यांनी केले आहे.सकल धनगर समाज महाराष्ट्र च्या वतीने आयोजित हा मोर्चा दिनांक 13 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता अहिल्यादेवी होळकर चौक कोकणवाडी ते विभागीय आयुक्तालय असा असणार आहे या मोर्चासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव औरंगाबादला दाखल होणार असल्याचे विदर्भ समन्वयक सतीश हांडे यांनी सांगितले.तसेच विदर्भातील अनेक ठिकाणाहून या मोर्चात धनगर समाज बांधव सहभागी होणार आहेत असे कळते आहे. जय मल्हार च्या घोषणांनी धडकणारा हा पिवळं वादळ मोर्चा जोरदारपणे यशस्वी होईल असा आयोजकांना विश्‍वास आह

सतिष हांडे हे सकल धनगर समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते असून ते रा स प या पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष देखील आहेत.