बाबा गोरखनाथ मंदिराच्या महंतांची निर्घृण हत्या – संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या हत्या होणे लज्जास्पद !

81

रोहतक (हरियाणा) – येथील बाबा गोरखनाथ मंदिराचे महंत विजय (वय ५० वर्षे) यांची अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. १२ नोव्हेंबर या दिवशी एक व्यक्ती झज्जर-बादली या रस्त्यावरून जात असतांना तिला माजरा गावाजवळ एका निर्मनुष्य जागेत रक्ताच्या थारोळ्यात एक मृतदेह पडल्याचे आढळून आले. त्या व्यक्तीने या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांना तो महंत विजय यांचा मृतदेह असल्याचे समजले. त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून सदर शस्त्र जप्त केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध चालू केला आहे.

महंत विजय, बाबा गोरखनाथ मंदिरात एकटेच रहात होते. ते मूळचे भदानी या गावचे होते. ते अनुमाने एक वर्षापासून या मंदिराचे महंत होते. या मंदिराचे संस्थापक पंचल नाथ यांनी समाधी घेण्यापूर्वी मंदिराचे दायित्व महंत विजय यांच्याकडे सोपवले होते.

जाहिरात
नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।