रायगड, पेढी व सोनगाव प्रकल्पग्रस्त लाभार्थ्यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावु- आ. अरूण अडसड >< विश्रामगृहात भाजपाची बैठक संपन्न

0
573
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान) 
      रायगड, पेढी व सोनेगाव प्रकल्पग्रस्त लाभार्थ्यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावु असे मत भाजपा आमदार अरूण अडसड यांनी स्थानिक विश्रामगृहात रविवारी झालेल्या बैठकित व्यक्त केले. यावेळी धामक येथील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
      चांदूर रेल्वे येथील विश्रामगृहामध्ये भाजपा तालुका पदाधिकारी व शक्तीकेंद्रप्रमुख यांची बैठक रविवारी आयोजित केली होती. या बैठकीत संगटनात्मक चर्चा झाल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले की, साकालांतराने गेले कित्येक वर्षापासून आपले लोकप्रतिनीधी मतदारसंघात नसल्याने जनसामान्यांचे प्रश्न निकाली लागत नसल्याने चांदूर रेल्वे तालुक्यातील ग्रामीण भाग विकास कामापासून वंचित आहे, तेव्हा अरूण अडसड आमदार झाल्याने आम्हाला आता आशेचा किरण दिसत आहे अश्या प्रकारे भावना व्यक्त केल्या.
       यावेळी रायगड प्रकल्प, पेढी प्रकल्प व सोनगाव प्रकल्पबाधीत गावकऱ्यांनी अरूण अडसड यांच्यासोबत चर्चा केली. या प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न लवकरात लवकर निकाली लावू असे प्रतिपादन यावेळी अरूण अडसड यांनी केले. यादरम्यान धामक येथील संजय गवळी, सुरेश राजुरकर, रमेश शर्मा व अन्य कार्यकर्त्यांनी आ.अरूण अडसड, प्रताप अडसड यांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर चांदूर रेल्वे तालुका ग्रामीण व शहर भागातील शक्तीकेंद्र प्रमुख व बुथप्रमुखांची बैठक पार पडली. ज्यामध्ये संघटनात्मक चर्चा झाली. यावेळी सरकार जनसामान्यांचे प्रश्न निकाली लावण्यात तत्पर असून आपण सरकारच्या योजनांबद्दल व धोरणांबद्दल ग्रामीण भागातील जनतेच्या संपर्कात राहणे गरजेचे असून जनसामान्यांच्या हक्काचं हे सरकार आहे असे मत यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भाजपा युवा प्रताप अडसड यांनी व्यक्त केले. यावेळी असंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.