एकवीस गुणवंतांना पुरस्कार वितरण कार्यक्रम अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनचे आयोजन

0
1009
Google search engine
Google search engine

एकवीस गुणवंतांना पुरस्कार वितरण कार्यक्रम
अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनचे आयोजन

वाशिम : अल्टरनेटीव्ह मेडीसीन असोसिएशन महाराष्ट्रच्या दुसर्‍या वर्धापन दिनानिमित्त सामाजीक, शैक्षणिक, साहित्य, कविता, क्रीडा, विधिज्ञ, पत्रकारीता, राजकीय, व्यसनमुक्ती, शासकीय, दिव्यांग, उद्योग, वैद्यकिय, शेतकरी व सामाजीक संस्था आदी विविध क्षेत्रात भरीव समाजकार्य करणार्‍या एकवीस व्यक्तींना पुरस्कार घोषीत करण्यात आले असून हा सत्कार कार्यक्रम गुरुवार, 29 नोव्हेंबर रोजी स्थानिक स्वागत लॉन येथे आयोजन करण्यात आले आहे. या सत्कारामध्ये डॉ. प्रल्हाद कोकाटे मोरगव्हाण, समाजसेवी सुशिल भिमजीयाणी, रेडीओ वत्सगुल्मचे आर.जे. देव, कवी चाफेश्वर गांगवे रिसोड, गायक शेख मोबीन, विनोद शेलकर मुंबई, गायक शिवा साठे, सौ. गितादेवी राठी मंगरुळपीर, उत्कृष्ट शेतकरी सचिन सारडा, विष्णू नवघरे मेहकर, सुनिल डोंगरदिवे मेहकर, अशोक भालेराव येलदरी, पत्रकार संदीप पिंपळकर, डॉ. आमेर पठाण औरंगाबाद, समाजसेवी व पत्रकार निलेश सोमाणी आदींचा समावेश आहे. 29 नोव्हेंबर रोजी स्थानिक स्वागत लॉन येथे आयोजीत कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपुर्वक पुरस्कार वितरण करण्यात येतील. तरी सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अल्टरनेटीव्ह मेडीसीन डॉक्टर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष व आयोजक डॉ. माधव हिवाळे यांनी केले आहे.