महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील लेखपालास लाच स्वीकारताना अटक

0
692
Google search engine
Google search engine

अनिल चौधरी, पुणे :-

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जल व्यवस्थापन ठाणे येथील लेखापाल शांतीकुमार बाबुराव पाटील, वय ५७ वर्षे यांना तक्रारदाराकडून चौदा हजारांची लाच स्वीकारताना ठाणे अँटी करप्शन ब्युरो (एसीबी) ने रंगेहात` पकडले.

याबाबत ठाणे एसीबी युनिट ने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ठेकेदार असून विविध प्रकारचे कामे करत असतात. त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जलव्यवस्थापन अंबरनाथ या कार्यालयातील संगणक दुरुस्ती व देखभालीचे बिल मंजूर केल्याबद्दल तसेच जमा असलेले सेक्युरिटी डिपॉझीट परत देण्यासाठी व भविष्यात संगणक देखभालीचे टेंडर पुन्हा देण्यासाठी लेखापाल यांनी तक्रारदार यांच्याकडे सोळा हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी लोकसेवक यांच्याशी तडजोड करून चौदा हजार रुपये लाच देण्याचे ठरविले. परंतु तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अँटी करप्शन ब्युरो (एसीबी) ठाणे, यांच्या कडे तक्रार केली. तक्रारीची ठाणे एसीबीने पडताळणी केली असता ती तथ्य असल्याचे दिसून आल्याने ठाणे एसीबी युनिटने सापळ्याचे नियोजन करून लोकसेवक शांतीकुमार बाबुराव पाटील यांना तक्रारदाराकडून चौदा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. पुढील तपास ठाणे अँटी करप्शन ब्युरो (एसीबी)चे अधिकारी करत आहे.

सदरची कारवाई अँटी करप्शन ब्युरो (एसीबी) चे पोलीस उपअधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केली.

शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत त्यांनी अँटी करप्शन ब्युरो टोल फ्री. क्रमांक १०६४ संपर्क करावा , असे आवाहन केले आहे.