आज पत्रकारांची विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक – अ.भा.ग्रामीण पत्रकार संघ, अमरावती विभागाचे >< आयोजन पाच जिल्ह्यातील पत्रकार सामिल होणार

0
1892

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान )

सर्वसामान्यांच्या समस्येला, अन्यायाला न्याय मिळून देण्याचे काम पत्रकार करतो. न्याय मिळेपर्यंत अन्यायाला वाचा फोडतो. परंतु याच पत्रकारांच्या मागण्यांकडे, समस्येकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे शासनाने पत्रकारांच्या विविध मागण्या मान्य करून त्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शेकडो पत्रकार बंधू आज शनिवारी १७ नोव्हेंबरला दुपारी १ वाजता अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे. यानंतर राष्ट्रीय पत्रकार दिन अ.भा.ग्रामीण पत्रकार संघ विविध मागण्यांचे निवेदन देऊन साजरा करणारआहे.

यामध्ये शासनाकडील पत्रकार संरक्षण मसुदाचे काम वरीत मार्गी लावा, राज्य सरकारने केवळ एकाच संघटनेला दत्तक घेतले असून राज्यातील अन्य संघटनांना शासकीय समित्यांवर स्थान दिलेले नाही, सध्याच्या निष्क्रीय अधिस्विकृती समितीला मुदत वाढ देऊ नये, अधिस्विकृतीतेतील अनेक जाचक अटी असल्याने ग्रामीण व शहरी भागातील पत्रकार अधिस्वीकृती पासून वंचित राहल्याने या जाचक अटी शिथिल करा, सर्वच माध्यम क्षेत्रातील पत्रकारांचा कौटूंबिक सर्व्हे करा, सरसकट सर्व पत्रकारांची नोंदणी जिल्हा माहिती कार्यालयात अर्थात सरकारी दप्तरी व्हावी या संदर्भातील आदेश पारीत करावा, ग्रामीण व शहरी भागात सतत तीन वर्ष काम करणारे पत्रकार, वार्ताहरांना वृत्तपत्र संपादकाने लेटरहेडवर दिलेले अनुभव प्रमाणपत्र ग्राह्य धरून त्यांना ५० टक्के बस प्रवास सवलत लागू करा यांसह अनेक मागण्यांचे निवेदन अमरावती विभागीय आयुक्तांना आज १७ नोव्हेंबर ला ठिक १ वाजता देणार आहे. यामध्ये आज सुरूवातीला अमरावती, बुलढाना, यवतमाळ, अकोला व वाशिम या पाच जिल्ह्यातील पत्रकार अमरावती येथील चपराशी पुरा जवळील शासकिय विश्राम गृह (सा.बां. विभाग) येथे एकत्र येऊन तेथुन सर्व सोबत विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे. यानंतर विभागीय आयुक्तांना मागण्यांचे निवेदन सादर करणार आहे. या आंदोलनात अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यातील सर्व माध्यमातील शेकडो पत्रकार बंधूंनी मोठ्यां संख्येने सामिल व्हावे असे आवाहन केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने, कार्याध्यक्ष मधुसूदन कुलथे, महासचिव सुरेश सवळे, केंद्रीय मानद सचिव अशोक पवार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलासबाप्पू देशमुख, प्रदेश सचिव अशोक राठी, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष युसूफ खान, अमरावती जिल्हाध्यक्ष प्रा.रवींद्र मेंढे, जिल्हा कार्याध्यक्ष शशांक देशपांडे, राजेंद्र भुरे, उत्तमराव ब्राम्हणवाडे, वसंतराव कुळकर्णी, प्रभाकरराव भगोले आदींनी केले आहे.