तालुक्यात वाळू माफ़ियाकडून महसूल विभागाची दिवाळी साजरी नियोजन पूर्ण वाळू उपसा —————————————- रात्रिलाही अधिकार्याच्या हालचालिवर नजर,तर काही अधिकारी थेट वाळू माफियांच्या संपर्कात

0
869

तालुक्यात वाळू माफ़ियाकडून महसूल विभागाची दिवाळी साजरी नियोजन पूर्ण वाळू उपसा
—————————————-
रात्रिलाही अधिकार्याच्या हालचालिवर नजर,तर काही अधिकारी थेट वाळू माफियांच्या संपर्कात

चांदूर बाजार ता;-
तालुक्यात सद्या अवैद्य वाळू उपसा ,वाळू माफिया पूर्ण नियोजन करुणच करित असून त्या करिता त्यांनी मुख्य चौकात माणसे ठेवली असल्याचेही बोलले जात आहे.
तालुक्यात पूर्णा,मेघा,चारघड़ यासारख्या मोठ्या नदया असून लहाण मोठे नाले सुद्या आहे.यातिल बहुतांश नदी नाल्याचा उगम हा सातपुडया पासून आहे. त्यामुळे या नदी नाल्याना मोठ्या प्रामानात वाळू येत असते.व ही वाळू बाधकामासाठी सुद्या उत्तम दरजाची असते.त्यामुळे या वाळू ला मोठी मागणी असते.
30 सेप्टेंबर पासून तालुक्यात वाळू चा हार्सस संपला आहे.त्यामुळे तालुक्यात बाधकामे थाबली आहे.तर काही मिळेल त्या भावात घ्यायला तयार होतात.याचाच फायदा वाळू माफिया घेत आहे.दिवस भर वाळू गाडून् ठेऊन मध्यरात्रिला या वाळू चि वाहतूक करतात.लोक साखर जोपेत असताना त्या वेळी या वाळू माफ़ियाणा जनु, दिवस निघाल्या प्रमानेच वाळू चा उपसा करित असतात.या वाळू माफियांवर प्रभारी तहसिलदारांची करड़ी नजर असल्याचे फक्त बोलले जात आहे.मात्र या वाळू माफ़ियाची तहसील कार्यालय मधील काही अधिकारी यांना हाताशी घेऊन मोठ्या प्रमाणात उपसा करीत आहे.
तहसिलचि गाड़ी बाहेर निघताच संपूर्ण तालुक्यातिल वाळू माफिया सतर्क होतो. गाड़ी कुनिकडे जाणार या कड़े वाळू माफ़ियाणी ठेवलेली माणसे हे त्यांच्या गाडिवर लक्ष ठेउनच असते.मध्य रात्रिहि असे माणसे रस्त्यावर कसे राहतात.हा ही एक प्रश्नच आहे.
महसूल अधिकार्यानि कोणती गाड़ी मधुन आज तालुक्यात फिरायला निघाले त्यात कोन कोन आहे.ये वाळू माफ़ियाणी चौका चौकात ठेवलेल्या मानसानमुळे माफ़ियाना माहित होत असल्याने वाळू भरनारा ट्रक्टर नदी मध्ये आल्याची माहिती महसुल विभागाला मिळते मात्र या वाळू माफ़ियाच्या आणि सतर्कता मुळे या महसूल विभागाचे रिकाम्या हाताने परत येत आहे.