शिवसैनिकांच्या वतीने हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांना आकोटात अभिवादन…

0
866

अकोट/प्रतीनीधी

अखंड महाराष्ट्राचे कवच कुंडल मराठी अस्मितेचे मानबिंदू वंदनीय हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस शिवसैनिकांनी अभिवादन केले.अभिवादनाचा कार्यक्रम आज दि.१७ नोव्हेला .सभापती मनिष रामाभाऊ कराळे यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयात आयोजित केला होता.तसेच शिवाजी चौक येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ देखील शिवसैनिक तथा पदाधिकाऱ्यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

यावेळी शिवसेना गटनेता तथा सभापती मनिष रामाभाऊ कराळे,जेष्ठ शिवसैनिक श्रीकृष्ण उजिडे,संजय पालखेडे,गोवर्धन आवारे,माजी उपशहर प्रमुख विजय ढेपे,
शिवसेना ता.प्रचारक बबलू नांदूरकर,शिवसेना आदिवासी ता.प्रमुख सुभाष सुरत्ने,शरद सोनटक्के,तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर मानकर,धनराज गावंडे,युवासेना उपतालुका प्रमुख अंकुश कुलट,युवासेना उपतालुका प्रमुख विशाल चौधरी,
युवासेना उपतालुका प्रमुख रितेश उजिडे,युवासेना शहर समन्वयक शुभम परियाल,अक्षय घायल,नितीन काकड,धीरज बेलसरे,पवन बेलसरे,नरेश सभागचंदानी,सौरभ बरे तसेच बहुसंख्य शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.