वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे यांचा पियानो फ़ॉर सेल ।

0
1768
Google search engine
Google search engine
अनिल चौधरी, पुणे –
हि जुगलबंदी रंगणार दोन दिग्गज कलाकार प्रथमच एकत्र आल्यावर जो काही अनुभव रसिक प्रेक्षक अनुभवतात तो प्रचंड आनंददायी असतो. मग हा अनुभव जर रंगभुमीवरचा असेल तर तो अधिक रंगतदार, स्वर्णिम ठरतो. त्या दिग्गजांचा अभिनय, त्यांच्यातली संवादांची जुगलबंदी, विषयाच्या आशयाला आणि सादरिकरणाला अतुलनिय उंचीवर पोहोचवते. अगदी हाच आणि असाच एक सुखद अनुभव सर्व रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत प्रस्तुतकर्ते चैतन्य गिरिश अकोलकर आणि डिज़िटल डिटॉक्स ही निर्मिती संस्था – “पियानो फॉर सेल” या नाटकाद्वारे! आणि या नाटकाच्या निमित्ताने ज्या दोन दिग्गज अभिनेत्री प्रथमच रंगभुमीवर एकत्र येत आहेत त्या आहेत – वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे विज.
लेखिका मेहेर पेस्तोनजी लिखित “पियानो फॉर सेल” या मूळ इंग्रजी नाटकाचे नाट्य रुपांतर आणि दिग्दर्शन हे आशिष कुलकर्णी यांचे आहे. अत्यंत आगळ्या वेगळ्या विषयाच्या या नाटकाचे प्रयोग १ डिसेंबर २०१८ पासून संपूर्ण महाराष्ट्रात तसेच परदेशातही करण्याचे प्रयोजन आहे.