दुरदर्शन वृत्त प्रतिनिधी विशाल बोरे शासनाच्या प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीवर

0
689
Google search engine
Google search engine

कृषी,पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास मत्स्यविकास विभागाच्या शासन निर्णयाद्वारे नियुक्ती

अकोला/ विशेष प्रतिनीधी : केंद्र शासनाच्या प्राणी क्लेष प्रतिबंधक अधिनियम १९६० मधील तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हयामध्ये प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी स्थापना व नियमन २००१ च्या नियम ३ मधील तरतुदीनुसार संदर्भाधीन अधिसूचनेन्वये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्य करणाऱ्या जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीवर दूरदर्शनचे वृत्तप्रतिनिधी विशाल प्रभाकर बोरे यांची ‘व्यवस्थापकीय समिती अशासकीय सदस्यपदी’ महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार राज्य शासनाने १६ नोव्हेंबर रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाद्वारे नियुक्ती करण्यात आली.

सदर अशासकीय सदस्य पदाचा कार्यकाळ हा नियुक्तीपासून तीन वर्षे राहणार असून जिल्हा प्राणी क्लेश सोसायटीच्या माध्यमातुन प्राण्यांच्या संरक्षणाबाबत हितकारक कार्य करण्यात येणार आहे व्यवस्थापकीय समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्तीसाठी विशाल बोरे यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.विशाल बोरे हे या व्यतीरीक्त विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनीधी आहेत.