मानव सेवा हीच ईश्वर सेवा…प्रा. सौ. माया म्हैसने ..

0
838
Google search engine
Google search engine

मलकापुर गोंड येथे आदिवासी सुसंवाद व कपडे वाटपाचे आयोजन

आकोट/संतोष विणके

परमेश्वरा ने सर्वांनाच परिपुर्ण जीवन दिलेलं नाही,काही जणांकडे भरमसाठ ,तर काहींना वस्तूंची चणचण,अशी विषमता समाजात दिसून येते,हे हेरून व समाज ऋणातून मुक्त होण्याच्या उद्देशाने श्रीरत्न बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष प्रा, सौ.माया म्हैसने,दिनद्याल शाखेचे श्री. गजानन घोगे ,तसेच श्रीसत्य साई ट्रस्ट चे श्री.किशोर रत्नपारखी यांच्या संयुक्त विद्यमाने मलकापूर गोंड येथे आदिवासी सुसंवाद व कपडे वाटप कार्यक्रमाचे दि.२५ नोव्हे.रोजी आयोजन करण्यांत आले होते . यावेळी परमेश्वर हा सर्वत्र असतो त्यामुळे मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा,असल्याचे मत प्रा.सौ माया म्हैसने या यांनी व्यक्त केले.तर डॉ पुसेगावकर व श्री किशोर रत्नपारखी यांनी स्वच्छता व आरोग्य यांचे महत्त्व आदीवासी बंधुना पटवून दिले,.यावेळी गावातील महिलांनी मोकळ्या मनाने सौ,माया ताईशी संवाद साधला .

त्यांच्या समस्या सोडविन्याचा प्रयत्न करण्याचे अभिवचन यावेळी मान्यवरांनी दिले. या कर्यक्रमाला सौ,उषा गिरनाळे, सौ शिल्पा ढोले,कु,सोनू माकोडे,श्री गजानन बोराळे,श्री संजय जोशी,रामभाऊ आठवले,पिंपळगावकर,प्रशांत बनोले,,नरेंद्र दहिकार,,श्री वाणी साहेब,सुनील लगड,आकाशवाणी औरंगाबादचे श्री, राऊत, प्रवीण हातवळणे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन श्री,गजानन बोराळे यांनी तर आभारप्रदर्शन सौ,शिल्पा ढोले यांनी केले, मलकापूरचे श्री राजाभाऊ सुरगये यांनी कार्यक्रम आयोजन व यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य केले.