श्री संत नरसिंग महाराजांच्या पालखीचे गुरु पूजेसाठी उमरा येथे प्रस्थान

0
1257
Google search engine
Google search engine

अकोट/ संतोष विणके :- श्री संत नरसिंग महाराज यात्रेला प्रारंभ झाला असून श्री संत नरसिंग महाराजांची पालखी गुरु पूजनासाठी आज दुपारी उमरा ला रवाना झाली असून. गुरुपूजन झाल्यानंतर पालखी सायंकाळी सात वाजता आकोट येथे परत मंदिरात पोहचणार आहे.

तालुक्यातील उमरा येथील श्री संत कुँवतशाअली मियासाहेब हे श्री संत नरसिंग महाराज यांचे गुरू होते. त्यांनी केलेल्या उपदेशाप्रमाणे आपण सर्वच ईश्वराची लेकरे आहोत, ईश्वराजवळ हिंदू-मुसलमान हा भेद नाही सर्वांचा ईश्वर एकच आहे असा मीया साहेबांनी उपदेश करीत श्री संत नरसिंग महाराजांची उपस्थितीत समाधी घेतली. तत्पूर्वी भक्ती मार्ग दाखवून त्यांचा उद्धार करावा असे त्यांना आवाहन केले. तेव्हापासून महाराजांनी सदर यात्रा सुरू केली असून ती आजतागायत तशीच चालू आहे. यात्रा कार्तिक वद्य पंचमीला होते तसेच कार्तिक वद्य चतुर्थीला संदल असून श्री संत नरसिंग महाराजांची पालखी गुरु पूजेसाठी उमरा येथील श्री संत कुँवतशा अली मियासाहेब यांचे समाधीस्थानी जात असते.

त्याचप्रमाणे 26 नोव्हेंबर 2018 रोज सोमवारला श्री संत नरसिंग महाराजांची पालखी गुरु पूजेसाठी गुरुस्थानी उमरा येथे श्री नरसिंग मंदिर येथून श्री ह भ प सुभाष रामचंद्रबुवा वर्मा रा.कुटासा व शेकडो टाळ मृदंगधारी जयजयकारात निघाले. पालखीचे मार्गात ठिकठिकाणी स्वागत करण्यात येऊन दर्शन घेतले गेले.तसेच गवळीपुरा स्थित डॉ राजेश नागमते यांच्या निवासस्थानी पालखीची पूजा अर्चना करुन लिंबू सरबत चे भाविकांना वितरण करण्यात आले. पालखी उमरा येथे पोहोचल्यानंतर श्री ह. भ. प. सतीश भाऊ आसरकर यांचे हस्ते गुरुपुजा होऊन पालखी सायंकाळी आकोट येथे मंदिरात परत येईल.