प.वि.पाटील व ए. टी. झांबरे विद्यालयात महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार

0
968
Google search engine
Google search engine

जळगाव :-

शिक्षणाचे उद्धारकर्ते क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त के.सी.ई. सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील व ए. टी. झांबरे विद्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करून सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

सर्वप्रथम शाळेच्या मुख्य.सौ.रेखा पाटील व पर्यवेक्षिका उषा नेमाडे यांच्या हस्ते क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
हजारो वर्षापासून शिक्षणापासून वंचित असलेल्या बहुजन समाजासाठी व स्त्रियांसाठी शिक्षणाचे द्वार ज्यांनी खुले केले, आज आपण अन्यायाविरोधात ज्या शिक्षणाच्या जोरावर विरोध करतो ते शिक्षण महात्मा फुले यांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहचवले म्हणून खऱ्या अर्थाने आजचा दिवस हा शिक्षक दिन आहे अशा शब्दात उपशिक्षक योगेश भालेराव यांनी आपले विचार व्यक्त केले.

सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनाविषयी सुंदर अशी माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन योगेश भालेराव यांनी केले तर आभार कल्पना तायडे यांनी मानले.प्रसंगी उपशिक्षिका कल्पना तायडे , सरला पाटील , दिपाली चौधरी , रेखा चौधरी , स्वाती पाटील , प्रणिता झांबरे आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.