कायदा व सुव्यवस्था सांभाळणार्या, पोलीसांवरील हल्ल्यात वाढ.                                                                          ***सी.आय.डी.च्या अहवालातील सत्य.                            ***जिथे पोलीसच असुरक्षित, तेथे नागरिकांच्या सुरक्षेचे काय?.                                                                         ***समाज मनात चिंतेचे वातावरण.

0
927

कायदा व सुव्यवस्था सांभाळणार्या, पोलीसांवरील हल्ल्यात वाढ.                                                                          ***सी.आय.डी.च्या अहवालातील सत्य.                            ***जिथे पोलीसच असुरक्षित, तेथे नागरिकांच्या सुरक्षेचे काय?.                                                                         ***समाज मनात चिंतेचे वातावरण.                      

****चांदूर बाजार/प्रतिनिधी।                                          ****राज्यातील कायदा व सुव्यवस्था सांभाण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. त्यासाठी आपले कर्तव्य बजावणार्या पोलिसांवर, हल्ले होण्याचे प्रमाणात दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येत आहे.गुन्हेगारांकडून पोलिसांवरील  हल्ल्यामुळे,जिथे पोलिसच असुरक्षित आहेत. तिथे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय?.असा यक्ष प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.परिणामी समाज मनात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.                                                        *****हा विषय यवतमाळ जिल्ह्यातील एका घटनेने पुन्हा ऐरणीवर आला आहे. परंतू हेआजच घडत आहे असे नाही. मागील काही वर्षांचा आढावा घेतल्यास, पोलिसांवरिल हल्ल्यात दिवसेंदिवस वाढच होत असल्याचे स्पष्ट होते. याची सत्यता पटवून देण्यासाठी, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहवालातील आकडेवारी पुरेशी आहे. याच महिन्यात नागभीड पोलीस ठाण्यात, उपनिरीक्षकांच्या अंगावर वाहन चढविण्यात आले. यात त्यांचा म्रुत्यु झाला. दुसरी घटना यवतमाळ जिल्ह्यातील आहे. याठिकाणी गुन्हेगार व त्याच्या आईने, हवालदारावर हल्ला करून त्याला ठार केले. याघटनांमुळे पोलिसच नव्हे तर, समाजमन ही अस्वस्थ झाले आहे.                               ****सी.आय.डी.च्या२०१६च्या अहवाला नुसार,२०१५मध्ये ३७०पोलीस कर्मचार्यांवर हल्ले करण्यात आले. तर२०१६मध्ये४२८पोलिसांवर हल्ले करण्यात आले होते. यात२०१६मध्ये ५६पोलीस कर्मचार्यांचा म्रुत्यु झाला. यात सर्वाधिक म्रुत्यु चे प्रमाण चंद्रपूर जिल्ह्यात आहे. येथे११पोलीस कर्मचार्यांना गुन्हेगार्याच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला आहे. दुसर्या क्रमांकावर भंडारा जिल्हा असून, या जिल्ह्यात२०१६मध्ये पाच पोलीस अधिकारी व कर्मचार्यांचा म्रुत्यु झाला होता. तर गडचिरोली व जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी चार पोलिसांना प्राण गमवावे लागले. तसेच अहमदनगर, रायगड, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई या ठिकाणी, प्रत्येकी तीन पोलिसांचा हल्ल्यामध्ये म्रुत्यु झाला आहे.                                                            ****गुन्हेगार्याच्या हल्ल्यात म्रुत झालेल्यामध्ये,५७ पैकी५५हे पोलिस कर्मचारी आहेत.यात२४पोलीस शिपाई,१९हवालदार,१३सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ईत्यादी चा समावेश आहे. या हल्ल्यात एका पोलीस उपनिरीक्षक अधिकार्याचाही म्रुत्यु झाला आहे.गुन्हेगारांकडून पोलिसांवर होणारे हल्ले व त्यात पोलिसांचा होणारा म्रुत्य.हीअतिशय गंभीर बाब आहे. याची राज्याच्या ग्रुहखात्याने तातडीने दखल घेणे गरजेचे आहे. कारण कायदा व सुव्यवस्था सांभाळताना, पोलिस सुरक्षित असतील तरच नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहील.     ********************************************गुन्हेगारांकडून पोलीसांवर होणारे हल्ले व त्यात त्यांचा होणारा म्रुत्यु. याबाबत समाज मनाचा कानोसा घेतला असताअनेकांनी, राजकारणात गुन्हेगारी प्रव्रुत्तींचा वाढता शिरकाव. स्थानिक पातळीवर गुन्हेगारांना व अवैध धंदेवाल्यांना मिळणारे राजकीय संरक्षण. यामुळे गुन्हेगारांच्या मनातील, पोलीसा विषयीची भिती नाहिसी झाली आहे. परिणामी पोलिसावरी हल्ल्याचा आलेख दिवसागणिक वाणतच जात आहे. यावर ग्रुहखात्यासह राज्य सरकारने ही त्वरित उपाययोजना करावी. अन्यथा असे निर्ढावलेले गुन्हेगार, भविष्यात समाज जिवनात ही अराजकता निर्माण करतील. असे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले.                                                                    ********************************************मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक,औरंगाबाद, अमरावती, कोल्हापूर, या ९ पोलिस आयुक्तालयातर्ग१६३पोलीस कर्मचार्यावर ,गुन्हेगारांकडून हल्ले करण्यात आले आहेत. यात आठ पोलिस कर्मचार्यांचा म्रुत्यु झाला आहे. यापैकी सर्वाधिक९१हल्ले मुंबई शहरात झाले आहेत.पोलीसांवरील हल्ल्या बाबत राज्याच्या विचार केल्यास, मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे. तर त्यानंतर अनुक्रमे, बुलढाणा(४०),गडचिरोली(३५),पुणे शहर(२९),व अमरावती ग्रामीण(२७)असा क्रम लागतो.       ********************************************दंगलीत सर्वाधिक फटका.                                               एखाद्या ठिकाणी दंगल उसळल्यास सर्वधीक फटका, सार्वजनिक मालमत्तेला व पोलीस विभागाला बसतो. दंगल नियंत्रणात आणतांना पोलिसांचे जखमी होण्याचे प्रमाण४४.८६ टक्के आहे. पाठलाग करतांना अपघात होण्याचे प्रमाण३४.५८ईतके आहे. तर गुन्हेगारांकडून जखमी होण्याचे प्रमाण१४.९५ टक्के आहे.                         ********************************************जखमी मध्ये शिपाई जास्त.                                                *कायदा व सुव्यवस्था सांभाळत असतांना, सर्वाधिक नुकसान होते ते पोलीस शिपायांचे. गुन्हेगारांकडून झालेल्या हल्ल्यात, जखमी व म्रुतांन मध्ये सर्वाधिक प्रमाण पोलीस शिपायांचे च आहे.जखमी झालेल्या मध्ये२६५शिपाई,८७हवालदार,१८सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,४०उपनिरीक्षक,,१२पोलीस निरीक्षकसमावेश आहे. तर सहा वरिष्ठ पोलीस अधिकार्याचा समावेश आहे.   *******************************************