‘हिंदुस्तान टाइम्स’ (मुंबई आवृत्ती) या इंग्रजी दैनिकाचे संपादक, प्रकाशक आणि मुद्रक, मालक आणि अपकीर्तीकारक लेख लिहिणाऱ्यांच्या विरोधात १० कोटी रुपये हानीभरपाई मागणीचा दिवाणी दावा प्रविष्ट

0
650

फोंडा (गोवा) ‘हिंदुस्तान टाइम्स’ (मुंबई आवृत्ती) या इंग्रजी दैनिकाच्या ६ सप्टेंबर २०१८ या दिवशीच्या अंकात ‘From Obscurity to heart of conspiracy’ आणि ‘Inside the ashram lies a mesh of secrecy and rules’ या मथळ्याखाली अपकीर्तीकारक लेख प्रसिद्ध करून सनातन संस्थेची मानहानी केली होती. त्यामुळे सनातन संस्थेची अपरिमित हानी झाल्याने संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’ (मुंबई आवृत्ती) या इंग्रजी दैनिकाचे संपादक सचिन कालबाग, प्रकाशक आणि मुद्रक शरद सक्सेना, मालक ‘एच्.टी. मीडिया लिमिटेड’ आणि अपकीर्तीकारक लेख लिहिणार्‍या ईशानप्रिया एम्.एस्. यांच्या विरोधात १० कोटी रुपये हानीभरपाई मागणीचा दिवाणी दावा येथील दिवाणी न्यायालयात प्रविष्ट केला आहे.

सनातन संस्थेचे मानद कायदेविषयक सल्लागार अधिवक्ता रामदास केसरकर यांच्यामार्फत ३० मे २०१८ या दिवशी कायदेशीर नोटीस पाठवून त्यांच्याकडून मानहानी भरपाईच्या रकमेची मागणी करण्यात आली होती; मात्र या मागणीची पूर्तता न झाल्याने श्री. वीरेंद्र मराठे यांनी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते गजानन नाईक, नागेश जोशी-ताकभाते, कु. दीपा तिवाडी, कु. अदिती पवार आणि रामदास केसरकर यांच्यामार्फत न्यायालयात दावा प्रविष्ट केला आहे.