आज जीवन प्राधिकरण विभागावर धडकणार शिवसेनेची भव्य निवेदन रॕली

188

आकोट/संतोष विणके

शिवसेनेचे पाणीपुरवठा सभापती मनिष कराळेंचा पाणी प्रश्नावर एल्गार….

जीवन प्राधिकरण विभाग कार्यालयावर आज शिवसेनेची भव्य निवेदन रॕली धडकणार आहे. ही रॕली शिवसेनेचे पाणीपुरवठा सभापती मनिष कराळें यांच्या नेतृत्वात पाणी प्रश्नावर आकोट शहरातील जनतेला न्याय मिळवुन देण्यासाठी शिवसेनेने आयोजीत केली आहे.आकोट शहरात २००६ ते २०१६ पर्यंत पिण्याच्या नळातून पाण्याऐवजी फक्त हवा येत राहली त्या हवेचे सुद्धा बिल जिवनप्राधिकरणाने जनतेवर लादले ते बिल जीवनप्राधिकरण विभागाने माफ करावे.करिता पाणीपुरवठा सभापती मनिष कराळे आज दि.३ डीसे. २०१८ ला शेकडो नागरिकांसह जीवन प्राधिकरण विभाग कार्यालयावर निवेदन रॕलीसह धडकार आहेत.अकोट शहरातील जनतेला जीवनप्राधिकरण विभागाकडून जो इतक्या वर्षात आर्थिक भुर्दड सहन करा लागत आहे त्या विरोधात हे निवेदन मनिष कराळे यांच्या नेतृत्वात देण्यात येणार आहे.

शिवसैनिक युवासैनिक महिला आघाडी सदस्या तसेच अकोट शहरातील नागरिकांनसह दु १२ वा मनिष कराळे यांच्या संपर्क कार्यालयाजवळुन ही रॕली निघणार आहे. असे अकोट शिवसेनेच्या वतीने कळवण्यात आले आहे.या रॕलीत शिवसेना-युवासेना,शिवसेना महिला आघाडी अकोट शहरचे बहुसंख्य कार्यकर्ता पदाधिकारी व नागरीक सहभागी होणार आहेत.

जाहिरात
नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।