सिरसोली येथे आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व स्व. विश्वनाथ चिंचोळकर पुण्य स्मृतिदिनाचे आयोजन

111

अकोट/प्रतीनीधी

गुरुवंदन सत्यशोधक आश्रम सिरसोलीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आज दिनांक 3 डिसेंबरला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,गाडगे बाबा ,निसर्ग वासी विश्वनाथ चिंचोळकर स्मृती दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त देहदान रक्‍तदान ,अवयवदान, नेत्रदान जनजागृती उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती सुशिलाबाई विश्वनाथ चिंचोळकर यांच्या हस्ते होणार आहे. तसेच याप्रसंगी गुरुवंदन सत्यशोधक पुरस्कार वितरण ,देहदान नेत्रदान संकल्प शिबिर तथा वकृत्व स्पर्धा देखील पार पडणार आहे.यावर्षीचा गुरुवंदन सत्यशोधक पुरस्कार सप्तखंजेरीवादक संदीप पाल महाराज यांना रामपाल महाराज तथा JC नंदकिशोर शेगोकार यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरित करण्यात येणार आहे.

त्यानंतर वकृत्व स्पर्धा पार पडणार आहे. सर्व गुरुदेव भक्त तथा गावकऱ्यांनी उपस्थिती राहुन कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र भूषण सप्तखंजेरीवादक राष्ट्रीय कीर्तनकार सत्यपाल महाराज यांनी केले आहे.

जाहिरात
नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।