आकोट तालुक्यातील दुष्काळग्रस्तांच्या समस्येवर मुख्यमंत्री घालतील का फुंकर…

151

आमदार मागतील का दुष्काळ मदतीचं दान

अकोट/संतोष विणके

यंदा राज्यात अपुरा पाऊस झालेला असताना अकोला जिल्ह्यातही अपुऱ्या पावसाने दुष्काळ संकट गंभिर झाले आहे या दुष्काळात करपणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता शासनाने दुष्काळी तालुक्यांची यादी करत दुष्काळ परिस्थितीशी दोन हात करण्यास सज्ज झाले आहे.मात्र जिल्ह्यात पातूर व अकोट तालुका या दुष्काळ मदतीपासून वंचित आहे. अकोट तालुका खारपाणपट्ट्यात येत असल्याने तालुक्यात कोरडवाहुक्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. तर अपुरा पाऊस व घटती भूजल पातळीने दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना दुष्काळ निकषात अकोट तालुका नसल्याने शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत आश्चर्य म्हणजे वान धरणाचे लाभ क्षेत्र असणारा तेल्हारा तालुका दुष्काळी यादित घोषित झाल्याने शेतकरी मात्र शासनाच्या या अजब धोरणाने आश्चर्यचकित झाले आहे. तर आकोट तालुक्यातील एकच सर्कल ट्रीगर 2 मध्ये समाविष्ट करण्यात आल्याने दुष्काळाची झळ सहन करणारा खारपान पट्ट्यातील शेतकरी शासनाने वाऱ्यावर टाकला असल्याची भावना जनतेच्या मनात निर्माण होत आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री अकोला जिल्ह्यातील कायम दुष्काळी पट्ट्यातील तालुक्याला न्याय देतील का…? आमदार शेतकऱ्यांची ही विवंचना मुख्यमंत्र्यांना सांगतील का…? प्रशासनावर पकड असणारे आमदार मुख्यमंत्र्यांना दुष्काळ मदतीचं दान मागतील का…? असे अनेक प्रश्न तालुक्यातील जनता आता विचारत आहे…शेतकरी आत्महत्यांचा आगडोंब हा आणखी फैलवण्याआधीच आता तरी शासनाने तालुक्यातील शेतकर्‍यांच्या मदतीला धावून जावे हीच आता सामान्य जनाची आशा आहे.

जाहिरात
नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।