छत्रपती यशवंतराव होळकर खरे आद्यस्वातंत्र सेनानी -प्रा.सोमनाथ लांडगे

0
805
Google search engine
Google search engine

छत्रपती यशवंतराव होळकर खरे आद्यस्वातंत्र सेनानी -प्रा.सोमनाथ लांडगे

उस्मानाबाद/ प्रतिनिधी
छत्रपती यशवंतराव होळकर हे भारताचे खरे आद्यस्वातंत्र सेनानी असून, त्यांनी तब्बल १८ वेळा इंग्रजांचा पराभव केला असे प्रतिपादन प्रा.सोमनाथ लांडगे यांनी जत्रा फंक्शन हॉल येथे छत्रपती यशवंतराव होळकर यांच्या २४३ व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात केले.
पुढे बोलताना प्रा.सोमनाथ लांडगे म्हणाले की, जर छत्रपती यशवंतराव होळकरा सारख्या राजाला दीर्घ आयुष्य लाभले असते, तर या देशावर इंग्रज राज्यच करू शकले नसते. त्यांच्याकडे छत्रपती शिवरायांचा गनिमी कावा, सुभेदार मल्हारराव होळकरांचे मल्हारतंत्र या दोहोंचा मिलाप होता आणि त्याचाच वापर करून त्यांनी इंग्रजांना सलग १८ युद्धात पराभूत केले.
६ जानेवारी 1799 रोजी यशवंतरावानी माहेश्वर येथे वैदिक पद्धतीने राज्याभिषक करून घेतला आणि ते सार्वभौम राजे झाले. शत्रूला क्षीण करून संपविण्याची त्यांची पद्धत इंग्रज ओळखून होते म्हणून त्यांनी यशवंतराव कडे अनेक वेळा त्यांच्या ताब्यात असलेला प्रांत देऊन तह करण्याचा प्रयत्न केला. कट्टर देशभक्त असलेल्या यशवंतरावांनी तो तह अनेक वेळा धुडकावून लावला आणि अखेरच्या श्वासापर्यंत इंग्रजाविरोधचा लढा कायम ठेवत त्यांना या भारत भूमीतून पळवून लावण्याचा प्रयत्न केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उस्मानाबाद चे माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर हे होते, प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश कांबळे, विजयाताई सोनकाटे, सोमनाथ गुड्डे, कमलाकर दाणे, श्याम तेरकर, आदीनी मनोगत व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंती उत्सवसमितीचे अध्यक्ष राम जवान यांनी केले तर आभार श्रीकांत तेरकर यांनी मानले.
तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजा छत्रपती यशवंतराव होळकर यांच्या २४३ व्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले, यावेळी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भारत डोलारे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ऍड.खंडेराव चौरे, पत्रकार राजाभाऊ वैद्य, अॅड.मनिष वाघमारे, शिवाजी कोळेकर, शिवाजी गावडे, संदीप वाघमोडे, अमित घुले, बळीराम खटके, दीपक क्षीरसागर
काकासाहेब सोनटक्के, गणेश एडके, खंडेश्वर लोकरे, रामराजे सुसलादे, तानाजी लांडगे,दादा वाघे यांच्या सह शेकडो समाज बांधव उपस्थित होते.

गुणवंताचा सत्कार
यावेळी छत्रपती यशवंतराव होळकर जयंती उत्सवसमितीच्या वतीने शासकीय सेवेत यश संपादन केलेल्या प्रमोद सोनटक्के आणि हणमंत लांडगे यांचा सत्कार करण्यात आला.