उमरगा मुख्याधिका-याच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध

0
579

उमरगा मुख्याधिका-याच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध

उस्मानाबाद / प्रतिनिधी

उमरगा नगरपालिकेत मुख्याधिका-यांच्या सततच्या गैरहजेरीमुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या नगरसेवक व कार्यकर्त्यांकडून मंगळवारी दि.४ रोजी मुख्याधिका-याच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त करण्यात आला.
उमरगा पालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश पाटील हे गेल्या एक महिन्यापासून वैधकीय रजेवर आहेत. त्यामुळे परांड्याचे मुख्याधिकारी दिपक इंगोले यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. पण परांडा ते उमरगा हा प्रवास तब्बल सव्वाशे दीडशे किमीचा असून येण्यात व जाण्यात पूर्ण दिवस जातो त्यामुळे त्यांनी पूर्ण महिन्याभरात एकदाच उमरगा पालिकेत पाऊल ठेवले आहे. अधिका-यांना महत्त्वाची असलेल्या कागदपत्रांवर उस्मानाबाद येथे बसुन स्वाक्षरी केली जाते. परिणामी पालिकेच्या कामकाजात विस्कळीतपणा आला असून शहरातील विकासकामे, ज्या नगरपालिकेच्या वतीने पुरविल्या जाणाऱ्या सुविधा पुरविण्यात पालिका प्रशासन पुरते अपयशी ठरले आहे. विविध विकासकामाबाबतचे नियोजन करण्यास जबाबदार अधिकारी गैरहजेरीमुळे अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी वा त्यांचे गाऱ्हाणे ऐकण्यासाठी मुख्याधिकारी नसल्याने नेमकी दाद कोणाकडे मागावी असा प्रश्न नागरिकापुढे निर्माण झाला आहे. रोजच्या या समस्येला कंटाळून शिवसेनेचे नगरसेवक पंढरीनाथ कोणे यांनी मंगळवारी दि. ४ रोजी दुपारी शिवसेनेच्या कार्यकर्ते सोबत घेऊन मुख्याधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला. यावेळी रत्नाकर सगर, युवा सेनेचे संदीप चौगुले व कार्यकर्ते यांचा सहभाग होता.

(दिपावलीपुर्वी मुख्याधिकारी रजेवर गेले आहेत. नविन मुख्याधिकारी उमरग्याला अद्याप आलेलेच नाहीत. तब्बल २५ दिवसांपासून पालीकेला मुख्याधिकारी येत नसल्याने शहरवासीयांना प्रचंड हाल होत आहेत. शहरातील काळे प्लाॅटमधील महिलांची श्वच्छालयाचे दरवाजाचे मोडले आहेत व अनेक ठिकाणी पाणी नाही. डुकरांचा सुळसुळाट झाल्याने महिलांना फिरकणेही मुस्कील झाले आहे. शहरातील गटारी तुंबल्या आहेत. नागरीकांना वेळेवर स्वच्छ पाणी मिळत नाही. टांगा पलटी घोडे फरार अशी पालिकेची अवस्था झाल्याचे नगरसेवक पंढरीनाथ कोणे यांनी सांगितले.)